Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

योगासने आणि रोग निवारण

Webdunia
WD
योगासनाने शरीरात उर्जा वाढतेच तसेच ती नियमित केल्याने विविध आजारांवर देखील नियंत्रण ठेवता येते. आजारानुसार त्यांच्यावर उपयोगी आसने खालीलप्रमाणे-
* एसिडीटीसारख्या पित्ताच्य ा आजारावर शलभासन, नाडी शोधन, शीतळी शितकरी आणि प्लविनी प्राणायामाने फायदा होतो.
* निद्रानाशावर- सर्वांगासन, सूर्यभेदी प्राणायाम, शीतली शीतकरी व योगनिद्रेचा फार फायदा होतो.
* पोटाच्या विकारात सर्वांगासन, बध्दपद्‍मासन, पश्चिमोत्तासन, सर्पासन, चक्रासन, मत्स्येद्रासन, उंटासन व पोटाचे व्यायाम लाभदायी ठरतात.
* कंबरदुखीसाठी- पाठीच्या कण्याचे व्यायाम, योगक्रिया, सुखासन, पद्‍मासन, त्रिकोणासन, उत्कटासन, अर्धमत्स्येद्रासन, गोमुखासन, वज्रासन, सुप्‍तवज्रासन, मत्स्यासन, उष्ट्रासन, भुजंगासन, धनुरासन, एकपाद, शंक्खासन, नौकासन गुणकारी आहेत. पाठदुखीवरही या आसनांचा उपयोग होऊ शकतो.
* बध्दकोष्टतेसाठी- शलभासन, धनुरासन, पश्चिमोत्तासन, चक्रासन, भुजंगासन, अर्धत्स्येद्रासन, उष्टासन, हलासन, सर्वांगासन ही आसने करावीत. अथवा डावी नाकपुडी बंद करून उजवी मोकळी ठेवा. मुलबंध बांधून 100 पावले चाला. (शौचाची क्रिया रोखण्यासाठी स्थिती) किंवा चार ग्लास पाणी पिऊन ताडासन, स्कंधासन, तिर्थक भुजंगासन, शंखासन आदी आसनांच्या दररोज एक एक आवृत्ती कराव्यात
* करपट ढेकरांवर सर्वांगासन, ‍शीर्षासन, जानुशिरासन, भुजंगासन, चक्रासन, बध्दपद्‍मासन, उष्टासन, कर्णपिडासन आदी आसने उपयुक्त आहेत. यापैकी सर्वांगासन व ‍शीर्षासन अधिक लाभदायी आहेत. तात्काळ फायदा होण्यासाठी मत्स्यासन, अर्धमत्स्यासन, उर्ध्वपद्‍माससारख्या आसनांचा अभ्यास करावा.
* कातडीचे विकार दूर करण्यासाठी प्रार्थनेबरोबरच शंखपद्‍मासन व नाडीशोधन करावे.
* मांडी तसेच जांगेतील आजारांसाठी सर्वांगासन, जानुशिरासन, पश्चिमोत्तासन, अर्धमच्छेंद्रासन, सूर्यभेदी प्राणायाम नेतीजलनेती करावी तसेच वरील आसन अधुनमधून करत राहिल्यास सर्दीपासून संरक्षण मिळते.
* सुरकुत्यांवर कर्णी योगमुद्रा, शवासन, योगक्रियांचा उपयोग होतो.
* तीव्र रक्तादाबावर वज्रासन, पवनमुक्तासन, शशांकासनाबरोबर शीतली, शीतकरी आणि भ्रामरी प्राणायामाचा उपयोग होतो. शवासनानेही ताण, थकवा दूर झाल्याने रक्त दाब आटोक्यात येतो.
* दमा तसेच श्वासाच्या आजारावर शवासन, मत्स्यासन, शलभासन, सुप्‍तवज्रासन, भुजंगासन, उष्ट्रासन, शंखपक्षालन, भस्त्रिका, कपालभाती, उज्जाई प्राणायाम प्राणप्रयोग यांचा उपयोग होतो.
* नाक, कान व घशाच्या विकारावर सिंहासन, मत्स्यसनाबरोबर जलनेती प्राणायाम व यौगिक क्रिया उपयोगी आहेत.
* जुलाबाव र सर्वांगासन, हलासनाबरोबर मुलबंध कार्योत्सर्गँ शितली प्राणायाम करावेत.
ND
* पचनासाठ ी पश्चिमोत्तासन, भुजंगासन, मयुरासन, शलमासन, ताडासन, उडियानासन, वज्रासन, त्रिकोणासन, अर्धमच्छेंद्रासन आदी आसने लाभदायी ठरू शकतात.
* पोटदुखीव र उत्तानपादासन, पवनमुक्तासन, वज्रासन, मच्छेद्रासन, भुजंगासन, उडियान योगमुद्रा रेचन करावे.
* पायांसाठ ी पद्‍मवीरासन, पर्वतासन, महावीरासन, अर्धबध्दपद्‍मासन, पश्चिमोत्तासन व योगक्रिया कराव्यात.
* बहिरेपणासाठी- सिंहासन, शीर्षासनाबरोबर भ्रामरी प्राणायाम नेतीक्रिया, यौगिक क्रिया कराव्यात.
* हातासाठ ी धनुरासन, बकासन, चक्रासन, उर्ध्वपद्‍मासन, हस्तभुजासन, कुक्कुटासन, वज्रासन, लोलासन फार उपयोगी ठरतात.
* मधुमेहासाठ ी इष्टवंदन, हलासन, सर्वांगासन, जानुशीरासन, पश्चिमोत्तासन, भुजंगासन, मत्स्यासन, अर्धमच्छेंद्रासन, सुप्‍तवज्रासन, शशांकासन, गोमुखासन, ताडासन, योगमुद्रासन, मुलबंध बांधुन भस्त्रिका भ्रामरी नाडी शोधन शीतकरी आणि शितली प्राणायाम करावे.
* जाडेपणा कमी करण्यासाठी धनुरासन, पश्चिमोत्तासऩ सर्वांगासन, त्रिकोणासन, हलासन, शलभासन, अर्धमच्छेंद्रासन, पादहस्तासन, योगमुद्रेबरोबर, उडियान आणि नाडी शोधन प्राणायाम, योगिक क्रिया व मेरूदंडाचे व्यायाम करावे.
* यकृतदोषांवर - पश्चिमोत्तासन, शलभासन, सर्वांगासन, हलासन, धनुरासन, भुजंगासन, बध्दपद्‍मासन, शशांकासन, हस्तपादोत्तानासन, उष्ट्रासनाबरोबर वीर वंदन किंवा परमेष्टी वंदानाने अधिक लाभ होतात.
* रक्ताच्या कमतरतेव र- सर्वांगासन, हलासन, शलभासन, पश्चिमोत्तासन, भुजंगासन, मत्स्यासन, नाडी शोधन प्राणायाम व शितली प्राणायामाने रक्तशुध्दी व रक्तवृध्दीस लाभ होतो. कमी रक्तदाबावरही योगासनामुळे नियंत्रण ठेवता येते. त्यासाठी वज्रासन, योगमुद्रा हकली आसने आणि नाडी शोधन कायोत्सर्ग यासारखी आसने करावीत.
* स्लिपडिस् क - नौकासन, धनुरासन, शलभासन, भुजंगासन व मकरासनाने अधिक लाभ होऊ शकतो.
* सुज आल्यास- शरीरावर सुज आलेल्या भागाच्या आतल्या नसांना ताणणारे प्रकार लाभदायक ठरतात. उर्ध्वसर्वंगासन व शीर्षासन यामुळे सुज येण्याची प्रक्रिया कमी होते.
* तोतरे बोलण्याव र नौकासन, सिंहासन, उत्थितपद्‍मासनाबरोबर शीतकरी, शितली आणि भ्रामरी प्राणायामाने तोतरेपणा कमी होतो.

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

प्रॉन्स फ्राय: मसालेदार कोळंबी रेसिपी

National Farmers Day 2024: 23 डिसेंबरलाच शेतकरी दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या

नाश्त्यामध्ये बनवा मटार कचोरी, जाणून घ्या रेसिपी

मधुमेहाच्या उपचारासाठी पिंपळाची पाने खूप फायदेशीर आहेत, जाणून घ्या

डोळ्यांखाली काळी वर्तुळे काढण्यासाठी मधाने उपचार करा

Show comments