Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्मार्ट योगाने मान दुखणे बरे करा, हे योगासन अवलंबवा

Webdunia
मंगळवार, 2 मार्च 2021 (18:09 IST)
मोबाईलमुळे मान दुखते का आम्ही प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात आहोत आणि जगभरात मोबाइल फोन मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. शिक्षणा पासून आरोग्यापर्यंत वैयक्तिक संबंधापासून व्यवसायापर्यंत, मोबाईल आणि इतर उपकरणांनी संपूर्ण जगात बदल घडून आणले आहे. 
 
परंतु मोबाईलचा व्यापक वापर केल्यामुळे किंवा गैरवापर केल्यामुळे जीवनशैलीत विविध धोके समोर आले आहे. या मुळे टेक्स्ट नेक मानेचे दुखणे वाढत आहे. टेक्स्टनेक हा एक प्रकाराचा नवीन जीवनशैलीचा आजार आहे. हा आजार बऱ्याच काळ मोबाईल, लॅपटॉप,टॅबलेट किंवा ई-बुक चा वापर केल्याने वाकून बसल्याने उद्भवतो. या अवस्थेमुळे मानेत आणि पाठीत वेदना होतात. 
 
सामान्य स्थितीत माणसाचे कान खांद्याच्या अगदी वर असतात तर डोक्याचे वजन 4.5 किग्रॅ असते. एक इंच मान जरी पुढे केल्यास हे वजन पाठीच्या कणांवर येत. स्मार्ट फोन मांडीवर ठेवून बघताना अंदाजे 10 ते 14 किलो वजन पाठीच्या कणांवर पडते. जे अधिक आहे. हे आपल्याला असंतुलित करण्यासाठी पुरेसे आहे. मानेला होणाऱ्या या टेक्स्ट नेक च्या त्रासासाठी काही योगासन सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपल्याला आराम देतात.चला तर मग जाणून घेऊ या. 
 पाठ आणि मान बळकट असणं आणि शरीराची लवचीकता शरीराला अवांछित तणावापासून मुक्त करते. इथे काही आसन आणि योगा आहे जे कंबर, मानेला बळकट करून लवचीकता देतील. ह्या आसनाचा नियमित सराव केल्याने मोबाईलने होणारी पाठीची वेदना आणि मानेचा तणाव देखील दूर होईल.
 
1 कानाला ओढून मॉलिश करा- 
आपल्या दोन्ही कानाला हळुवारपणे वर पासून खालपर्यंत हळुवार दाबा. दोन्ही कान धरून बाहेर ओढा आणि हळूहळू घडाळ्याच्या दिशेने आणि उलट दिशेने हळुवार फिरवा. असं केल्यानं कानाच्या भोवतीचे ताण कमी होईल आणि आराम मिळेल. 
 
2 हात ओढा-
आपले दोन्ही हात डोक्यावर ठेवा आणि हाताचे तळवे आकाशाकडे करा.हात वर ओढून धरा.हाताला खांद्याच्या समांतर पसरवा आणि हाताचे तळवे आणि बोटे वर खाली उजवीकडे डावीकडे करा. या मुळे हातांना आणि खांद्यांना आराम मिळेल. 
 
3 खांदे फिरवा- 
आपल्या हाताला खांद्यांच्या समांतर करा. अंगठ्याने लहान बोटाच्या खालच्या भागाला स्पर्श करा. खांदे घड्याळाच्या दिशेने आणि उलट दिशेने फिरवा.
 
4 हाताचे तळवे छातीकडे आणा. खांदे स्थिर ठेवून हाताने छातीवर दबाव टाका. हात बदलून दुसऱ्या हाताने हीच स्थिती करा. 
 
5 कोपऱ्याने आठची आकृती बनवा-
 आपले दोन्ही हात छातीच्या समोर आणा. दोन्ही हाताच्या बोटांना एकमेकांना जोडून घ्या. आता दोन्ही हाताचे खांदे आणि कोपऱ्यापासून आठची आकृती बनवा. 
 
6 खांदे ताणणे- 
आपल्या उजवा हाताला डोक्या खाली ठेवा आणि डाव्या हाताने गुडघ्याला घट्ट धरून ठेवा. आता  उजवा हात डोक्यापासून कुल्ह्या पर्यंत फिरवा. हे अनेकदा करा. 
 
7 अंगठ्याने दाबा-
आपले दोन्ही हाताचे अंगठे छातीच्या समोर आणा. त्यांना दोन्ही दिशेने बऱ्याच वेळा फिरवा. दोन्ही हाताच्या बोटांना दाबा आणि सोडा, ही प्रक्रिया बऱ्याच वेळा करा. 
हे सर्व व्यायाम वेदना दूर करण्यासाठी पुरेसे आहेत, परंतु खालील गोष्टींचा अनुभव घेऊन फायदा घ्या. 
 
1 डिव्हाईसची स्थिती ला बदला-
मानेचे आणि पाठीची वेदना कमी करण्यासाठी डिव्हाईस मांडीवर ठेवून वाकण्या ऐवजी अशी स्थिती बनवा की जी नैसर्गिक असावी डिव्हाईस डोळ्याच्या समोर असावे.
 
2 विश्रांती घ्या-
जर आपण संपूर्ण दिवस डिव्हाईस वापरता तर थोड्या-थोड्या वेळाने विश्रांती घ्या आणि शरीराला आणि डोळ्यांना विश्रांती द्या. ब्रेक नंतर आपण स्थिती बदलू शकता. 
 
या योगांचा सराव करून आपण आरोग्याच्या कोणत्याही धोक्यापासून वाचण्यासाठी अवलंबवा आणि स्मार्टफोन योगी बना. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

थंडी विशेष : गाजर पराठा रेसिपी जाणून घ्या

हिवाळा येताच पाठदुखीचा त्रास वाढू लागला तर या 5 उपायांनी लगेच आराम मिळेल

बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी मध्ये करिअर करा

जर तुम्ही तुमच्या पायात खाज आणि संसर्गामुळे त्रस्त असाल तर हे 7 घरगुती उपाय करून पहा

Health Alert : शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी हानिकारक आहे का?

पुढील लेख
Show comments