Festival Posters

श्वास आणि पोटाचे आजार बरे करण्यास उपयुक्त मत्स्यासन

Webdunia
गुरूवार, 24 जून 2021 (17:26 IST)
योगाद्वारे शरीराचे अनेक विकारांवर मात करता येते. त्याचा नियमित सराव केल्याने शरीराची चरबी कमी करण्यासह अनेक आजारांपासून सुटका होते. अनेक बऱ्याच आसनांपैकी एक मत्स्यासन अनेक आजारांवर रामबाण म्हणून काम करतं. मत्स्यासनात शरीर मासोळीच्या आकाराचं बनत ज्यामुळे याचे नाव मत्स्यासन ठेवण्यात आले. 
 
मत्स्यासन करण्याची विधी -
मत्स्यासन करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीवर बसकट किंवा आसन घालून बसावं. पायाला पद्मासनाच्या मुद्रेत ठेवून मागच्या बाजूस झोपा. या स्थितीत राहून श्वास आत धरून कंबर उंच धरा. या स्थितीत असताना हे लक्षात ठेवावं की शरीराचा कुल्ह्याचा भाग आणि डोकं हे जमिनीवरच असावं पण कंबर उंच ठेवावी. जमिनीला स्पर्श होता कामा नये. ही क्रिया आपल्या क्षमतेनुसार एक ते 5 मिनिटा पर्यंत हळू-हळू वाढवा. आपली इच्छा असल्यास सुरुवातीला जमिनीवर सरळ झोपून देखील आपण पायांना पद्मासनाच्या स्थितीत आणू शकता. 
 
आसन केल्याचे फायदे -
मत्स्यासन केल्यानं संपूर्ण शरीर मजबूत होतं. पोटाच्या सर्व आजारांपासून आराम मिळतो. तसेच पोटाची चरबी देखील कमी होते. योग्यरीत्या श्वास घेण्यास मदत मिळते आणि घसा स्वच्छ होतो. मत्स्यासन दृष्टी वाढविण्यास देखील मदत करतं.
 
जर एखाद्यास त्वचेशी संबंधित आजार असतील तर त्यांना या आसनाचे फायदे मिळतात. हे आसन दररोजच्या पचनाचा समस्येला देखील दूर करतं. तसेच बायकांच्या मासिक पाळीच्या समस्यांना देखील दूर करण्यात मदत मिळते.
 
मत्स्यासन करू नये -
जर एखाद्या व्यक्तीला कंबर दुखी किंवा गुडघे दुखीचा त्रास होत असल्यास तर या आसनाला करू नये. तसेच गरोदर बायकांनी हे आसन करणं टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अकबर-बिरबलची कहाणी : तीन रुपये, तीन गोष्टी

डिनर मध्ये बनवा चविष्ट हिरव्या मुगाची भाजी, जाणून घ्या रेसिपी

Besan Dosa कुरकुरीत बेसन डोसा रेसिपी

हिवाळ्यात बाहेर फिरायला जाता येत नसेल, तर घरी इन्फिनिटी वॉकचा प्रयत्न करा. आकृती 8 मध्ये चालण्याचे फायदे जाणून घ्या

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

पुढील लेख
Show comments