Dharma Sangrah

पद्मासन

वेबदुनिया
एकाग्रचित्त राहण्यासाठी केल्या जाणार्‍या आसनांमध्ये पद्मासन हे महत्त्वाचे आसन आहे. पद्म म्हणजे कमळ, म्हणून या आसनाला कमलासनही असेही म्हणतात.

कृती : हे आसन बसून केले जाते. आधी पाय लांब करून बसा. उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा धरून डाव्या पायाला उजव्या पायाच्या जांघेवर ठेवा. नंतर उजवा पाय डाव्या जांघेवर ठेवा. दोन्ही हाताचे पंजे गुडघ्यांवर सरळ ठेवा. दोनही हाताचे अंगठ्याजवळील बोट अंगठ्यावर ठेवा. बाकी तिन्ही बोटे सरळ ठेवा. डोळे बंद करा. पाठ ताठ ठेवून बसा. पद्मासनाला सर्व दुर्भावनांचा विनाशक म्हटले जाते.

पद्मासनाचे फायदे : ' इंद पद्मासन प्रोक्तंसर्वव्याधी विनाशनम्' -म्हणजेच पद्मासन सर्व व्याधींचा नाश करते. सर्व व्याधी म्हणजेच शारीरिक,
 
WD
दैविक आणि भौतिक व्याधी.

पद्मासन केल्याने साधक किंवा रोग्याचे चित्त शांत होण्यास मदत होते. साधना आणि ध्यान करण्यासाठी हे आसन उत्कृष्ट आहे. याने चित्त एकाग्रीत होते आणि एकाग्रचित्ताने धारणा सिद्ध करता येते.

घ्यावयाची काळजी : ज्यांचे पाय अती प्रमाणात दुखत असतील त्यांनी हे आसन करू नये.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

Turmeric vegetable पौष्टिकतेने समृद्ध रेसिपी हळदीची भाजी

हे पदार्थ पुन्हा पुन्हा मायक्रोवेव्ह मध्ये गरम करू नये

बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बीटेक) इन इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग करून करिअर बनवा

सुंदर आणि दाट केसांसाठी केळी आणि ऑलिव्ह ऑईल वापरण्याचे फायदे जाणून घ्या

हिवाळा विशेष ब्रेकफास्टमध्ये बनवा Healthy Egg Sandwich Recipe

पुढील लेख
Show comments