Dharma Sangrah

नौकासन

Webdunia
या आसनाच्या शेवटच्या भागात आपल्या शरीराची अवस्था एखाद्या नावेप्रमाणे होते. यामुळेच या आसनाला नौकासन म्हणतात.

कृती: शवासनात ज्या पद्धतीने आपण जमिनीवर शांतपणे झोपतो त्याच पद्धतीने जमिनीवर झोपावे. दोन्ही हात जमिनीला स्पर्श करत असावेत. मान सरळ असावी.

आता दोन्ही हात, पाय आणि मानेला सावकाश आकाशाच्या दिशेने वरती उचलावे. हे आसन जलद करण्याचा मुळीच प्रयत्न करू नये. अन्यथा मानेचा विकार उद्भवण्याची शक्यता असते. हे आसन करताना संपूर्ण शरीराचे वजन नितंबावर आधारीत असावे आणि सर्व लक्ष आकाशाकडे असावे.

WD
सूचना: शरीराला आकाशाच्या दिशेने उचलताना अत्यंत सावकाशपणे हे आसन करावे. यात कोणतीही घाई करू नये. पायाचे विकार असलेल्यांनी वा स्लिप डिस्कचा त्रास आहे अशांनी हे आसन करणे टाळावे

फायदे: या आसनाने पचन क्रिया चांगली होते. छोट्या आणि मोठ्या आतड्याचे काही विकार असतील तर त्यात आराम मिळतो. रक्त शुद्ध होण्यासाठीही हे आसन महत्त्वाचे आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Women's Day Special Dinner Recipes हे पदार्थ बनवायला सोपे आणि दिसायला 'रॉयल'

Women's Day Special महिलांकरिता सहलीसाठी महाराष्ट्रातील सुरक्षित पर्यटनस्थळे

वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात या उच्च प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा

NCERT Recruitment : NCERT मधील ११७ पदांसाठी भरतीसाठी लवकर अर्ज करा

क्रीमने नाही तर मनुकाच्या पाण्याने चेहऱ्याची चमक वाढवा

Show comments