suvichar

पवन मुक्तासन

Webdunia
असे करावे हे आसन: आधी जमिनीवर शवासनात झोपावे. नंतर दोन्ही पाय गुढघ्या पासून आत दुमडत पोटाशी घट्ट धरावेत. गुढघा छातीपर्यंत लावण्‍याचा प्रयत्न करावा, आणि पोटावर हलकासा दबाव आणण्याचा प्रयत्न करावा. आता श्वास अलगत बाहेर सोडत पुन्हा सावकाशपणे हनुवटीने गुढघ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा.

आपल्या शक्ती नुसार कालावधी निश्चित करावा. उदा: 10 सेकंदांपासून ते 30 सेकंदांपर्यंत हे आसन करावे. ( सरावाने कालावधी वाढूही शकतो.)

पुन्हा हलकासा श्वास सोडत पुन्हा शवासनाच्या आधीच्या स्थितीत यावे. हे आसन 3 ते 4 वेळा आपण करू शकता. हे आसन आणखी एका पद्धतीने करता येऊ शकते त्याला अर्ध पवनमुक्तासन असे म्हणतात. यात क्रिया करताना दोन्ही पायांऐवजी आधी उजवा आणि नंतर डावा असेही हे आसन आपण करू शकतो.

घ्यावयाची काळजी: जर तुम्हाला कमरेचे, पोटाचे आणि मानेचे विकार असतील तर कृपया हे आसन करण्याचा प्रयत्न करू नये. आसन शांतचित्ताने करावे.आसन करताना कोणत्याही स्वरूपाची घाई टाळावी.

WD
आसनाचे फायदे: या आसनामुळे पोयाचे विकार कमी होण्यास मदत मिळते, पचनाच्या विकारात हे आसन फायदेशीर आहे. हृदय रोग असो किंवा स्त्रियांच्या पोटाचे विकार या आसनाने तुम्हाला फायदा मिळेल.

वजन कमी करण्यासाठीही हे आसन फायदेशीर आहे, या आसनाच्या नियमित करण्याने पोटावरची चरबी कमी होण्यास मदत मिळते.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

जलद श्वासोच्छ्वास आणि हृदयाचे ठोके वाढणे एंग्जायटीची लक्षणे आहे, इतर लक्षणे जाणून घ्या

SBI Recruitment :एसबीआयने 800 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर केली, संपूर्ण तपशील जाणून घ्या

केसांच्या समस्येवर कांद्याचे पाणी उकळून लावण्याचे फायदे जाणून घ्या

उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो दुर्लक्षित करू नका

संयुक्त कुटुंबात राहणे योग्य आहे की अयोग्य? फायदे आणि तोटे जाणून घ्या

Show comments