suvichar

मत्स्यासन

Webdunia
मत्स्य याचा अर्थ मासा. या आसनात शरीराचा आकार माशासारखा होतो. म्हणूनच त्याला मत्स्यासन असे म्हणतात.

कृती- सुरवातीला पद्मासनात बसा. नंतर याच स्थितीत हळूहळू मागे जमिनीला पाठ टेकवा. लक्षात ठेवा जमिनीला पाठ टेकवत असताना गुडघे जमिनीला लागून असावेत. त्यानंतर मग डोके हळूहळू शरीराच्या दिशेने खाली म्हणजे पाठीच्या भागाखाली घ्यायला सुरात करा. त्यासाठी हाताचा आधार घ्या. त्यामुळे शरीराचा वरचा भाग वर होईल. आता हातांनी पायाचे अंगठे पकडा. आता तुमच्या शरीराची अवस्था अशी होईल. डोके पाठीच्या खाली टेकलेले. शरीराचा वरचा भाग वर उचललेला आणि हाताने पायाचे अंगठे पकडलेले. यामुळे तुमच्या पोटावर, छातीवर ताण येईल. चेहर्‍यावरही ताण येईल.

एक ते पाच मिनिटापर्यंत ही आसनस्थिती टिकवायला हवी. त्यानंतर मग पुन्हा सामान्य स्थितीत या. या आसनात श्वासोच्छवास सामान्य व्हायला हवा. श्वासासाठी त्रास करून घेण्याची गरज पडायला नको.

WD
सूचना- छातीत किंवा गळ्यात वेदना होत असतील तर किंवा काही आजार असल्यास हे आसन करू नका. हे आसन करताना अत्याधिक काळजी घ्या. कारण घाईघाईत किंवा न सहन होणार्‍या हालचाली केल्यास उगाचच शरीराचा एखादा अवयव दुखापतग्रस्त होण्याची शक्यता असते.

फायदा- या आसनाने डोळ्याची स्थिती सुधारते. गळ्याचा त्रास कमी होतो. छाती व पोटाचे विकार दूर होतात. रक्ताभिसरणाची गती वाढते. त्यामुळे चर्मरोग होत नाहीत. दम्याच्या रोग्यांना फायदा होतो. पोटाची चरबी कमी होते. खोकला हटतो.
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

तेनालीराम कहाणी : घागरीतला महासागर

डिनरमध्ये बनवा Spicy Soya Chilli Recipe

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

MSRTC Vacancy एसटी महामंडळात १७,७४२ पदांची महाभरती: कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार प्राधान्य

Show comments