suvichar

... योगा की जीम लावू मी?

Webdunia
शनिवार, 7 जून 2014 (14:46 IST)
पूर्वी लोक लोक व्यायामासाठी व्यायामशाळा, आखाड्यांत जात होते. पण हल्ली जीममध्ये जाऊ लागले आहेत. जीममध्ये शरीर नक्कीच कमावता येते, पण दैनंदिन जीवनासाठी त्याचा तितका उपयोग आहे काय? याचा विचार आपण करायला हवा.

तुम्हाला एखाद्या शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल, कुस्तीत जायचे असेल, हिरो बनायचे असेल किंवा वजन उचलायचे असेल तर जीम किंवा आखाड्यात जाणे योग्य आहे. पण हे सर्व करायचे नसेल तर मग थोडा विचार करणे जरूरी आहे. जीममद्ये अंगमेहनतीची कसरत करून घेतली जाते. या उलट घरगुती योग प्रकारत संपूर्ण अंगाला व्यायाम दिला जातो. पण उगाचच `घामकाढू` मेहनत होत नाही. जीमच्या कसरतीनंतर तुम्हाला थकवाजाणवतो पण योगासन केल्यानंतर तुम्हाला ताजेतवानं वाटायला लागतं.

वयाचा फरक
लहानपणी शरीर फारच लवचिक असतं. लहान मुलगा छोट्या मोठ्या जागेवरून पडतो तेव्हा त्याला फ्रॅक्चर होण्याची शक्यता कमी असते पण तरूण व्यक्तीपडतो तेव्हा त्याला फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. जीममध्ये हाडे व स्नायू दणकट होतात. पण जीम मध्येच सोडली तर हे कमावलेले शरीर सुटते. टणकझालेली हाडे आणि स्नायू म्हातारपणाकडे लवकर घेऊन जातात.

जीमचे शरीर
जीम जाण्यामुळे शरीर मजबूत व दणकट होते. त्या शरीराला अतिरिक्त जेवणाची गरज पडते. पण जीम सोडल्यानंतर शरीर एकदम ढिले पडू लागते म्हणून जीमची कसरत सुरू ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा हात-पायाचे दुखणे सुरू होते. वय वाढल्या बरोबरच सांध्यांची दुखणी डोके वर काढतात. स्नायू दुखू लागतात.

योगाचे शरीर
योग केल्याने शरीर लवचिक आणि मऊ होते. शरीराला अतिरिक्त भोजनाची गरज भासत नाही. योग केल्याने रोगप्रतिरोधक क्षमतेत वाढ होते. जास्त काळ योग केल्यानंतर शरीरात कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाही. जीमला जावे असे वाटत असेल तर जरूर जा! पण शरीराला थकवण्यासाठी नको!
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

अकबर-बिरबलची कहाणी : महागडा सुगंध

मुले पालकांच्या या सवयी आयुष्यभर विसरत नाहीत; प्रत्येक पालकाला त्या माहित असायला हव्यात

लग्नानंतर सासरच्यांसोबत बॉन्डिंग कसं वाढवाल? नव्या सुनेसाठी ५ सोप्या आणि प्रभावी टिप्स

गोड-आंबट वरण, महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक रेसिपी

Who should avoid Lychee या ५ प्रकारच्या लोकांनी चुकूनही खाऊ नये 'लिची'; फायद्याऐवजी होईल मोठे नुकसान!

Show comments