Festival Posters

सुप्त वज्रासन

वेबदुनिया
सुप्त याचा अर्थ झोपलेला. अर्थात वज्रासनाच्या स्थितीत झोपलेला. या आसनात पाठीच्या आधारे झोपावे लागते. म्हणूनच त्याला सुप्त वज्रासन असे म्हणतात.

कृती- दोन्ही पाय समोर पसरून बसा. दोन्ही पाय जोडा. हात बगलेत, कंबर सरळ आणि नजर समोर हवी. आता वज्रासनाच्या स्थितीत बसा. त्यानंतर दोन्ही पायात एवढे अंतर ठेवा की त्यामुळे नितंब जमिनीला लागली पाहिजेत. मग दोन कोपरांची मदत घेऊन जमिनीवर पडा.

उजवा हात मागे घ्या आणि डाव्या खाद्याच्या खाली घ्या. आता डावा हात मागे घेऊन उजव्या खांद्याच्या खाली घ्या. या अवस्थेत दोन्ही हाताची स्थिती कात्रीसारखी होते. यानंतर याच्या मधोमध डोके यायला हवे.

यानंतर परत पूर्वीच्याच अवस्थेत येण्यासाठी हात मांड्यांच्या बाजूला ठेवा आणि दोन्ही कोपरांच्या सहाय्याने उठून उभे रहा.

WD
सूचना- गॅसेसचा आणि कंबरदुखीचा त्रास असणार्‍यांनी हे आसन करू नये. जेवणानंतर वा काही खाल्ल्यानंतर लगेचच हे आसन करू नये.

नितंब टेकल्यानंतरच जमिनीवर झोपा. जेवढे आरामात झोपाल तेवढे चांगले. जास्त त्रास होईल, असे काही करू नका. सुरवातीला गुडघे एकत्र करून ठेवण्यात अडचण असेल तर वेगवेगळे ठेवले तरी चालतील. पण हळूहळू दोन्ही पाय एकत्र आणण्याचा प्रयत्न करा. जमिनीवर झोपल्यानंतर गुडघे वर यायला नको. जमिनीवर पाय समतल हवेत.

फायदा- गुडघे, वक्षस्थल, आणि पाठीच्या कण्यासाठी हे आसन फायदेशीर आहे. पोटाला चांगलाच ताण बसून तेथील नाडींमधील रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळे पोटासंदर्भातील तक्रारी कमी होतात.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

Pre pregnancy tests गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी पुरुष आणि स्त्रिया या दोघांनीही या चाचण्या करून घेतल्या पाहिजेत

अतिशय टेस्टी, कुरकुरीत आणि स्नॅक्ससाठी उत्तम मिक्स व्हेज ग्रिल सँडविच रेसिपी

एक ग्लास जिऱ्याचे पाणी आणि अनेक फायदे! उन्हाळ्यात जरूर करा सेवन

अभियांत्रिकी इच्छुकांसाठी उत्तम संधी, सेलने उच्च पगाराच्या नोकऱ्या जाहीर केल्या, संपूर्ण तपशील जाणून घ्या

उन्हाळ्यात टाचांच्या भेगा वाढल्या आहेत? हे घरगुती उपाय देतील झटपट आराम!

Show comments