suvichar

या मंदिरात पडतो केशर, चंदनाचा पाऊस

Webdunia
मंगळवार, 16 एप्रिल 2019 (11:15 IST)
भारतात लाखो मंदिरे आहेत आणि लाखोंच्या संख्येने भाविक तेथे दर्शनासाठी जात असतात. भारतातील अनेक मंदिरे केवळ पूजा अर्चेसाठी नाही तर तेथे घडणार्‍या चमत्कारासाठी प्रसिद्ध आहेत आणि हा चत्कार अनुभवण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने तेथे गर्दी करत असतात. 
 
मध्यप्रदेशातील बेतुल जिल्ह्यात सातपुडा पर्वत रंगांच्या मध्ये दाट जंगलात असलेले निसर्गसुंदर मुक्तगिरी धाम हे असेच एक मंदिर आहे. असे सांगतात या मंदिरात दर अष्टमीला चंदन आणि केशराचा पाउस पडतो. हे जैन मंदिर आहे. याची कथा अशी सांगितली जाते की हजारो वर्षांपूर्वी येथे एक मुनी ध्यान करत होते तेव्हा पहाडावरून पडल्याने एक बेडूक मरण पावला. या बेडकाच्या कानात मुनींनी मंत्राचा जप केला तेव्हा तो स्वर्गात देवलोकात पोहोचला. त्यावरून या पर्वताला मेढागिरी पर्वत असे नाव पडले. असे सांगतातकी स्वर्गात गेलेला हा बेडूक मुनींची भेट घेण्यासाठी येथे आला तेव्हा चंदन आणि केशराचा पाऊस पडला आणि दर अष्टीला असा पाऊस येथे पडतो. या पर्वत रांगात लहान मोठी 52 मंदिरे असून त्यात मुक्तगिरी सर्वात प्रसिद्ध आहे. या मंदिरात जाण्यासाठी 600 पायर्‍या चढाव्या लागतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

हनुमानजींकडून या गोष्टी शिका, ज्या तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतील

बुधवारी या ५ पैकी कोणतीही एक गोष्ट करा, समस्यांपासून मुक्ती मिळेल!

Padmini Ekadashi 2026 अधिकमासाची कमला अर्थात पद्मिनी एकादशी 27 मे रोजी, व्रत विधी आणि नियम जाणून घ्या

आरती बुधवारची

बुधवारी हिरवे मूग दान केल्याने कधीही धन-धान्याची कमतरता भासत नाही

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

पुढील लेख
Show comments