श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ ॐ नमो आदिनारायणा ॥ विश्वचाळका विश्वपाळणा ॥ चराचर जे कां रचना ॥ ते जाण तव सत्तें ॥ १ ॥ तेथें मी नमन कर्ता ॥ ही केउतीं पैं असे वार्ता ॥ म्हणोन मौन्याची वाग्लता ॥ चरणीं माथा ठेवित ॥ २ ॥ कुशळ करावी कविता ॥...