श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ जयजयाजी अनाथनाथा ॥ सगुणस्वरूपा कृपावंता ॥ ग्रंथारंभीं प्रार्थितों समर्था ॥ चरणीं माथा भावार्थे ॥ १ ॥ दिननाथ म्हणती कीं तुजला ॥ तरी काय नामातें विसरला ॥ षड्रिपु गांजिती मजला ॥ हें काय तुजला उचीत ॥ २ ॥ आम्ही तव अनाथदीन ॥ गांजिले प्रपंचवेदनेनें ॥...