Marathi Biodata Maker

दैनिक राशीफल 08-09-2021

Webdunia
बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (00:31 IST)
मेष : अपेक्षित मातांनी जमिनीवर चालताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. शक्य झाल्यास धुम्रपान करणार्‍यांपासून दूर रहा. होणार्‍या बाळावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आजच्या दिवशी तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे परंतु, या सोबतच तुम्ही दान-पुण्य ही केले पाहिजे कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तुम्ही सगळ्या समस्या, अडचणी विसरून कुटुंबातील सदस्यांसमवेत आनंदात वेळ घालवाल. 
 
वृषभ : डोळे कधीच खोटं बोलत नाहीत आणि तुमच्या जोडीदाराचे डोळे आज तुम्हाला काहीतरी विशेष सांगणार आहेत. आपल्या जोडीदाराने दिलेले वचन पाळले नाही म्हणून त्यावर उखडू नका. शांतपणे एकत्र बसून विचार करून गुंता सोडविणे गरजेचे आहे. संद्याकाळच्या वेळी तुम्ही कुठल्या जवळच्या व्यक्तीच्या घरी वेळ घालवण्यास जाऊ शकतात परंतु, या वेळात तुम्हाला त्यांची कुठली गोष्ट वाईट वाटू शकते आणि तुम्ही ठरवलेल्या वेळेच्या आधी परत येऊ शकतात.

मिथुन : अध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे तर, आज कुणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्यांना चांगला लाभ ही होऊ शकतो. पत्नीबरोबर खरेदी करणे आनंददायी ठरेल. एकमेकांना समजून घेणे आणि त्यानुसार वागणे यात वाढ होईल. 

कर्क : जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचा लवमेट तुमच्या गोष्टींना समजू शकत नाही तर, आज त्यांच्या सोबत वेळ घालावा आणि आपल्या गोष्टींना स्पष्टपणे त्यांच्या समोर मांडा. नेहमीपेक्षा आज तुम्ही उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल. अपेक्षित निकाल मिळाला नाही तरी नाराज होऊ नका. घरातील लहान सदस्यांसोबत गप्पा करून आज तुम्ही आपल्या रिकाम्या वेळेचा चांगला वापर करू शकतात.

सिंह : कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. आज तुम्ही आपल्या घरातील सदस्याला कुठे फिरायला घेऊन जाऊ शकतात आणि तुमचे बरेच धन ही खर्च होऊ शकते. तुमचे मित्र तुम्हाला पाठिंबा देणारे भेटतील. परंतु बोलताना सांभाळून बोला. कामच्या ठिकाणी जे काही उत्तम करत आहात त्यासाठी तुमच्या कुटुंबाकडून मिळणारे सहकार्य कारणीभूत आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल. 

कन्या : तुम्ही रिकाम्या वेळेत आपल्या आवडीचे काम करणे पसंत कराल. आज ही तुम्ही असेच काही काम करण्याचा विचार कराल परंतु, कुठल्या व्यक्तीचे घरात येण्याने तुमचा हा प्लॅन विस्कळीत होऊ शकतो. एखादा नातेवाईक तुम्हाला सरप्राईझ देईल, पण त्यामुळे तुमची योजना बारगळेल.

तुला : जीवन आनंदाने जगण्याची आपल्या अपेक्षा आकांक्षा तपासून पाहा. योगसाधनेची मदत घ्या. त्यामुळे तुम्हाला जीवनाचा आनंद शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक पद्धतीने कसा घ्यावा हे शिकता येईल. त्यामुळे तुमच्या स्वभावात सुधारणा होतील. जवळच्या नातेवाईकाकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते.

वृश्चिक : एकमेकांचा दृष्टिकोन समजावून घेऊन वैयक्तिक प्रश्‍न सोडवा. तुमची समस्या चव्हाट्यावर आणू नका अन्यथा तुमची बदनामी होण्याची शक्यता अधिक आहे. केलेल्या चांगल्या कामाबद्दल आज कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान केला जाईल. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधार्‍यांकडून मार्गदर्शन लाभेल. 

धनू  : जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील, आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल.मकर : जी गोष्ट तुमच्यासाठी आवश्यक नाही त्यावर तुमचा अधिक वेळ घालवू शकतात. तुम्ही आज योजना आखण्याआधी तुमच्या जोडीदाराचे मत घेतले नाही तर तुम्हाला विपरित प्रतिक्रिया मिळू शकेल.
 
कुंभ : मानसिक ताणात देखील आरोग्य चांगले राहील. लोकांना नेमके काय हवेय हे समजावून घ्या आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजून घ्या. परंतु आज खर्च करताना उधळपट्टी करू नका. तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. 

मीन  : जे लोक आत्तापर्यंत बेरोजगार आहे त्यांना चांगली नोकरी मिळवण्यासाठी आणि अधिक मेहनत करण्याची आहे. मेहनत करूनच तुम्हाला योग्य परिणाम मिळतील. आपल्या घनिष्ट मित्रांसोबत आज तुम्ही रिकाम्या वेळेचा आनंद घेण्याचा विचार करू शकतात. आज, तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती सोमवारची

Shri Kashi Vishwanath Stotram श्री काशीविश्वनाथ स्तोत्रम्

Narmada Jayanti 2026: नर्मदा जयंती तिथी, पूजा विधी, कथा आणि संपूर्ण माहिती

रथ सप्तमी व्रत कथा

Ratha Saptami 2026 : रथ सप्तमी कधी? शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख
Show comments