Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वर्ष 2021 मध्ये हे मंत्र जपा, ग्रहांचे दोष दूर करा

Webdunia
गुरूवार, 31 डिसेंबर 2020 (10:11 IST)
नवीन वर्ष सुरू होणारच आहे. नवे वर्ष घरात सौख्य, भरभराट, नवीन उत्साह घेऊन येवो आणि घरात आनंद आणि सकारात्मकता यावी या साठी काही ज्योतिषीय उपाय प्रभावी सिद्ध होऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार माणसाच्या सर्व सुख आणि त्रासाचा थेट संबंध माणसाच्या कुंडलीत असलेल्या नऊ ग्रहांशी असतो. हे ग्रह काही शुभ फळ देतात तर काही अशुभ फळे देतात. एखाद्याच्या कुंडलीत या ग्रहांशी निगडित काही दोष असेल तर ते दूर करण्यासाठी आणि शुभ फळे मिळविण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. 
हे नवीन वर्ष 2021आपल्या साठी सर्व प्रकाराचे आनंद घेऊन येवो या साठी 9 ग्रहाशी निगडित काही उपाय जाणून घ्या.
 
1 सूर्य - 
ज्योतिषशास्त्रात सर्व 9 ग्रहांमध्ये सूर्याचे विशेष महत्त्व आहे. माणसाच्या आयुष्यात सौख्य -भरभराट मान सूर्यदेवाच्या कृपेने मिळते. कुंडलीत ग्रहांचा राजा सूर्य प्रबळ आहे, तर माणूस राजा, मंत्री, सेनापती, प्रशासक, प्रमुख, धार्मिक संदेशक इत्यादी बनतो. पण कुंडलीत सूर्य कमकुवत असेल तर हे शारीरिक आणि यशाच्या दृष्टीने खूप वाईट परिणाम देतात. सूर्याचे दोष दूर करण्यासाठी आणि सूर्याचे शुभ परिणाम मिळविण्यासाठी दररोज उगवत्या सूर्याचे दर्शन करून त्यांना  'ॐ घृणि सूर्याय नम:' म्हणत अर्घ्य द्यावा. दररोज सूर्याला पाणी दिल्यावर लाल आसनावर बसून पूर्वीकडे तोंड करून खालील मंत्राचे 108 वेळा जप करावे. 
''एहि सूर्य सहस्त्रांशो तेजोराशे जगत्पते।
अनुकम्पय मां भक्त्या गृहणाध्र्य दिवाकर।।''
 
2 चंद्र - 
ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रहांमध्ये चंद्राला आई आणि मनाचे घटक मानले जाते. कुंडलीत चंद्र ग्रहाच्या अशुभतेमुळे घरात मानसिक आजार, कलह, अशक्तपणा, पैशाचा अभाव या सारख्या समस्या उद्भवतात. चंद्र देवाचे शुभ आशीर्वाद मिळविण्यासाठी आणि त्यांच्याशी निगडित दोष दूर करण्यासाठी जेवढे शक्य असल्यास स्वच्छतेकडे लक्ष द्या. चंद्रदोष दूर करण्यासाठी आणि त्यांची कृपा मिळविण्यासाठी चंद्र देवांचे खालील मंत्राने जप करणे शुभ आणि प्रभावी सिद्ध होते. 
ॐ ऐं क्लीं सोमाय नम:।।
ॐ श्रां श्रीं श्रौं स: चन्द्रमसे नम:।।
 
3 मंगळ-
दुर्दम्य धैर्यवान आणि सामर्थ्यवान पृथ्वीपुत्र मंगळ हा ग्रहांचा सेनापती मानला जातो. वैदिक ज्योतिषानुसार, कोणत्याही व्यक्ती मध्ये ऊर्जेचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी मंगळ दोष दूर करणे आवश्यक आहे. शनीप्रमाणे मंगळाच्या अशुभतेपासून घाबरतात. मंगळ देवांची कृपा मिळविण्यासाठी आणि त्याच्याशी जुडलेले दोष दूर करण्यासाठी या मंत्राचे जप करा. 
ॐ अं अंगारकाय नम:।
धरणीगर्भसंभूतं विद्युत्कांति समप्रभम्। 
कुमारं शक्तिहस्तं च भौममावाह्यम्। 
 
4 बुध- 
ज्योतिष शास्त्रानुसार बुध बुद्धी, व्यवसाय, त्वचा आणि संपत्तीचे ग्रह आहे. बुध ग्रहाचा रंग हिरवा आहे. ते 9 ग्रहांमध्ये शारीरिक दृष्टया कमकुवत आणि बौद्धिक दृष्टया आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकासाठी बुध देवांची कृपा आणि शुभता अत्यंत महत्त्वाची आहे. एखाद्याच्या कुंडलीत बुध ग्रह कमकुवत आहे किंवा खाली आहे तर बुध ग्रहाची शुभता मिळविण्यासाठी बुधाच्या बीज मंत्राचे जप करावे. 
'ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय् नम:।।
 
5 बृहस्पती - 
ज्योतिषशास्त्रात देवांचे गुरु बृहस्पतीला एक शुभ देवता आणि ग्रह मानले आहे. बृहस्पतीच्या शुभ प्रभावामुळे सौख्य, सौभाग्य, दीर्घायुष्य, धार्मिक लाभ मिळतात. जरी हे शुभ फळ देतात परंतु जर हे कुंडलीत एखाद्या पापी ग्रहांसह असला तर हे कधी-कधी अशुभ संकेत देतात. अशा परिस्थितीत बृहस्पतीची कृपादृष्टी मिळविण्यासाठी आणि या ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी दररोज तुळशी किंवा चंदनाच्या माळेने 'ॐ बृं बृहस्पतये नमः' या मंत्राचे 108 वेळा जप करावे.
देवानां च ऋषीणां च गुरुं कांचनसंनिभम्। 
बुद्धिभूतं त्रिलोकशं तं नमामि बृहस्पतिम्।।
 
6 शुक्र - 
ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला भौतिक सुखसोयीचें घटक मानले आहे. शुक्र ग्रहांपासून एखाद्या माणसाच्या आयुष्यात स्त्री सुख,वाहन सुख आणि संपत्ती सुख मिळतात. कुंडलीत शुक्र बळकट असल्याने या सर्व सुखांची प्राप्ती होते. पण हा ग्रह अशुभ असल्यास आर्थिक त्रासांना सामोरी जावे लागते. वैवाहिक जीवनातील सुखांचा अभाव होतो. शुक्र ग्रहाचे शुभ फायदे मिळविण्यासाठी या मंत्राचा जप करावे. 
ॐ शुं शुक्राय नम:। 
 
7 शनी-
कुंडलीत शनीचे प्रभाव जेवढे घातक आहे तेवढेच शुभ फळ देणारे देखील आहे. शनी कर्माचे देव आहे आणि केलेल्या कार्याचे फळ देतात. जर एखाद्याच्या कुंडलीत शनी दोष आहे तर ते दोष दूर करण्यासाठी आपल्या व्यवहारात बदल आणावे. आपल्या पालकांचा सन्मान करा त्यांची सेवा करा. तसेच शनिदेवांच्या मंत्राचे जप करावे. शनिदेवाचे हे मंत्र खूप प्रभावी आहे. शनिदेवाचे हे मंत्र श्रद्धेने जपल्याने नक्कीच फायदा होणार.
ॐ शं शनैश्चराय नमः।
ॐ प्रां प्रीं प्रौ सं शनैश्चराय नमः।
 
8 राहू -
कुंडलीत राहू आणि केतू हे छाया ग्रह आहे. कुंडलीत राहू अशुभ स्थितीत असल्यास माणसाला सहजपणे यशाची प्राप्ती होत नाही आणि त्रास सुरूच असतात. कुंडलीत या ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी राहू मंत्राचे जप केल्याने शुभ फळ मिळतात. 'ॐ भ्रां भ्रीं भ्रौं स: राहवे नम:'।
 
9 केतू -
केतू ग्रहाच्या दोषामुळे माणूस संभ्रमाला बळी ठरतो. या मुळे त्याला अनेक समस्यांना सामोरी जावे लागते. केतूचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सर्वप्रथम वडिलधाऱ्यांची सेवा करणे सुरू करा. त्यासह केतूच्या या मंत्राचे जप करा.ॐ कें केतवे नम:।

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती शनिवारची

शनिवारी हे 5 मंत्र जपा, शनीची कृपादृष्टी मिळवा

Lakshmi Puja शुक्रवारी लक्ष्मीजींना करा प्रसन्न, पैशाची कमतरता दूर होईल, सुख-समृद्धी येईल

आरती शुक्रवारची

।। श्री दत्तगुरूंची आरती ।।

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments