Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताहिक राशीफल 21 ते 27 मार्च 2021

Webdunia
शनिवार, 20 मार्च 2021 (16:43 IST)
मेष : या आठवड्यात ग्रहांमध्ये कुठलाही मोठा फेर बदल होण्याची शक्यता नाही आहे. म्हणून या आठवड्यात तुम्हाला मागील आठवड्याच्या तुलनेत फार काही बदल दिसणार नाही. या आठवड्याच्या सुरुवातीत तुमची रुची व्यावसायिक गोष्टींपेक्षा प्रेम प्रसंगात जास्त राहणार आहे. विवाहित लोकांसाठी हा आठवडा फारच अनुकूल आहे. या आठवड्यात तुमच्यात उत्साह आणि जोष राहणार आहे.
 
वृषभ : या आठवड्याच्या सुरुवातीत नोकरी करणार्‍या लोकांना अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्ही या आठवड्यात आपल्या उच्च अधिकार्‍यांसोबत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा कराल. तुम्ही तुमचे विचार त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न कराल. ज्याने त्यांच्या मनात तुमची  प्रतिमा एकदम चांगली होईल. या आठवड्यात  तुमच्या वैवाहिक जीवनात या थोडे निराशेचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.
 
मिथुन : या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला बौद्धिक कार्यांमध्ये आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार असून त्यात आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आपल्या व्यावसायिक जीवनात तुम्ही साम दाम दंड भेदाचे धोरण ठेवून पुढे जाल. तुम्हाला व्यवसायात स्टाफ, पार्टनर आणि कौटुंबातील सदस्यांकडून मदत मिळेल. औद्योगिक क्षेत्राशी निगडित लोकांना या आठवड्यात सकारात्मक संकेत मिळत आहे.
 
कर्क : या आठवड्याच्या सुरुवातीत तुमचे आरोग्य थोडे नरम गरम राहणार आहे. तुम्ही मानसिकरूपेण थोडे अस्वस्थ राहाल. तसं तर तुमच्याजवळ सुख सुविधा देणार्‍या सर्व वस्तू असतील. तुम्ही आर्थिकरूपेण जास्त सशक्त असाल, पण मनात एक भिती राहील. वाहन किंवा दागिन्यांची खरेदी करू शकता. तुम्हाला अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे.
 
सिंह : या आठवड्याच्या सुरुवातीत तुम्ही तुमचे काम यशस्वीरीत्या पार पाडाल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये तुमचा रस वाढेल.  तुमचा यश बघून तुमचे प्रतिस्पर्धी नाराज होतील आणि तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न देखील करतील. पण त्यांचे एक ही षडयंत्र कामी पडणार नाही. या आठवड्यात तुम्ही तुमच्या उत्पादनाच्या प्रचारासाठी खर्च कराल.
 
कन्या : या आठवड्याच्या सुरुवातीत तुमचे अडकलेले कामं पूर्ण झाल्याने कामाला गती येईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही नवीन कार्य सुरू करू शकता. घर, वाहन, दागिने, वस्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, गॅझेट्स इत्यादींच्या खरेदीवर विशेष खर्च करण्याची शक्यता आहे. तुम्ही विपरीत लिंगीप्रती आकर्षित होऊ शकता आणि एखाद्याच्या प्रेमात पडू शकता.
 
तूळ : आर्थिक प्रकरणासाठी हा आठवडा फारच उत्तम राहणार आहे. आर्थिक स्थिती उत्तम असल्यामुळे तुम्ही मानसिकरूपेण स्वस्थ अनुभवाल. तुम्हाला या आठवड्यात कमी मेहनत करून ही त्याचे उत्तम फळ मिळणार आहे. व्यावसायिक प्रकरणात ही तुमचे ग्रह साथ देणार आहे. तुमच्या उत्पादनाची बाजारात मागणी वाढल्यामुळे तुम्हाला त्याचा चांगला फायदा मिळणार आहे.
 
वृश्चिक :  कुणावरही डोळे बंद करून विश्वास करू नका. वाहन किंवा मशीनरी चालवताना सावधगिरी बाळगा कारण अपघात होण्याची शक्यता आहे. वाहन किंवा मशीनरी चालवताना सावधगिरी बाळगा कारण अपघात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुम्ही हनुमान चालीसाचा पाठ करा. तुमचे मानसिक संतुलन ठीक असल्याने कोणीही तुमची फसवणूक करू शकत नाही. 
 
धनू : या आठवड्यात तुम्हाला धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. ग्रहांचा तुम्हाला साथ मिळणार आहे. जर तुम्ही कोणाला उधार दिले असतील तर ते वेळेवर परत मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला बचतीकडे लक्ष्य द्यावे लागणार आहे. तुम्हाला पेपर वर्कमध्ये सावधगिरी बाळगावी लागणार आहे. घरात शुभ प्रसंगाचे आयोजन होऊ शकतात. प्रवास किंवा मनोरंजनाच्या साधनांवर पैसे खर्च होतील.
 
मकर : या आठवड्याच्या सुरुवातीत तुमच्या जीवनात शुभ प्रसंगांची झडी लागणार आहे. घरात होणार्‍या शुभ आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही व्यस्त राहणार आहात. या आठवड्यात तुमची मिळकतीच्या स्रोतांमध्ये वृद्धी होणार आहे. नोकरी करणारे लोक आपल्या मिळकतीत वाढ करण्यासाठी रिकाम्या वेळेचा सदुपयोग करतील. स्थायी मालमत्ता आणि वाहन खरेदीचे प्रबळ योग आहे.
 
कुंभ : आठवड्याच्या सुरुवातीत असे काही प्रसंग येतील ज्याने तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. सामाजिक जीवन आणि घरात देखील तुमचा मान वाढेल. समाज आणि मित्र मंडळात तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि त्यांची तुमच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलून जाईल. या आठवड्यात तुमची नवीन लोकांशी ओळख होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यम चरणात तुमच्या मिळकतीचे स्रोत वाढण्याची शक्यता आहे.
 
मीन : या आठवड्यात तुम्ही भाग्यावर अवलंबून राहू नका, कारण  तुम्ही जे काही कमावाल ती फक्त तुमच्या मेहनतीमुळेच मिळणार आहे. म्हणून गणेजींचा सल्ला आहे की या आठवड्यात तुम्ही कठिण परिश्रमासाठी तयार राहा. या आठवड्यात मिळकतीपेक्षा खर्च जास्त राहण्याची शक्यता आहे. म्हणून वायफळ खर्च करणे टाळा. अन्यथा तुमची आर्थिक स्थिती मंदावेल व तुम्ही मानसिक व्याकुलतेचा शिकार व्हाल.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Christmas 2024: गोव्यातील या ठिकाणी ख्रिसमस साजरा करा

Akhuratha Sankashti Chaturthi 2024: अखुरथ संकष्टी चतुर्थी या दिवशी या मंत्राचा जप करा, जीवनातील सर्व संकटे दूर करा

सद्गुरु श्री गजानन महाराज आरती मराठी

आरती सोमवारची

Mahadev Mantra महादेवाचे मंत्र सोमवारी नक्की जपावे

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments