Ayodhya News : आज म्हणजेच शनिवार 11 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तीन दिवसांचे सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात आहे. प्राण प्रतिष्ठाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या खास प्रसंगी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.