Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आर्यन खानला जामीन मंजूर : न्यायालयात काय घडलं?

Webdunia
गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (17:47 IST)
गेल्या अनेक दिवसांपासून ऑर्थर रोड तुरुंगात असलेल्या आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामुळे त्याचे वडील आणि बॉलिवुड सुपरस्टार शाहरुख खानला दिलासा मिळाला आहे.
 
आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांनाही कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने दोन ते तीन दिवस या प्रकरणाची सुनावणी घेतली. त्यानंतर नुकतेच तिघांचा जामीन मंजूर केला आहे. याबाबतचा सविस्तर आदेश कोर्ट उद्या पोलिसांना देईल. त्यानंतर तिन्ही याचिकाकर्ते उद्या संध्याकाळी किंवा शनिवारी तुरुंगाबाहेर येतील, असं आर्यन खानचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी माध्यमांना सांगितलं.
 
या प्रकरणात अटकेत असलेल्यांपैकी आर्यन, अरबाज आणि मुनमुन या तिघांनी कोर्टासमोर जामीन अर्ज दाखल केला होता.
 
सध्यातरी या तिघांना जामीन मिळाला असून बाकीच्या आरोपींनी अर्ज केल्यानंतर त्यांच्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
 
कोर्टाने जामीन दिला असला तरी कोर्टाकडून संपूर्ण आदेश मिळाल्याशिवाय तिघे तुरुंगातून बाहेर येणार नाहीत, असं आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितलं आहे.
 
आज न्यायालयात काय घडलं?
आज (28 ऑक्टोबर) दुपारी एकच्या सुमारास आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू झाली.
 
सुरुवातीच्या युक्तिवादादरम्यान, कोर्टाने NCB ACG यांना विचारलं की आर्यनवर सेक्शन 28,29 कशाच्या आधारावर लावला?
 
व्हॉट्सअॅप चॅटमध्ये कमर्शियल व्यवहर केल्याचं दिसल्याने हे कलम लावल्याचं उत्तर ASG यांनी दिलं.
 
यावेळी आर्यन खान नियमितपणे डृग्ज घेतो. डृग्जचा पुरवठा करतो याचे ठोस पुरावे आहेत, असा दावा NCB चे वकील अतिरिक्त सॅालीसिटर जनरल अनिल सिंह यांनी केला.
 
तसंच, आरोपींकडून विविध डृग्ज जप्त करण्यात आले. आरोपींना डृग्ज असल्याची माहिती होती आणि ते ड्रग्जचं सेवन करणार होते. आम्ही ड्रग्जच्या पझेशनबाबत बोलत आहोत. आर्यन खानला ड्रग्ज सोबत असल्याची माहितीही होती, असं NCB च्या वकिलांनी म्हटलं.
 
याला उत्तर देताना युक्तिवादात आर्यन खानचे वकील म्हणाले, "आर्यन खानकडून कोणतीही रकिव्हरी झालेली नाही. कमर्शियल क्वांटिटी आणि आणि कॉन्स्पिरसी यांच्याशी आम्ही एकाचवेळी आम्ही डिल करत आहोत. इतर पाच लोक काय कॅरी करतात ती आर्यनची जबाबदारी कशी काय?
 
ते पुढे म्हणाले, 1300 लोक त्या शीपवर होते, कॉन्स्पिरसी होती हे सांगताना पुरावे हवेत. ताज हॉटेलमध्ये 500 खोल्या आहेत. एका खोलीत ड्रग घेतले जात असतील तर हॉटेलमधील सगळ्यांना ताब्यात घेणार का? मग कॉन्स्पिरसी आहे हे सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावा काय, असा प्रश्न आर्यनच्या वकिलांनी विचारला.
 
कट रचण्यासाठी सगळ्यांना एकत्र यावं लागतं. अरबाझ सोडला तर आर्यन इतर कोणालाही ओळखत नाही. सेक्शन 29 कॉन्स्पिरसीसाठी लावलं ते इथे लागू होत नाही, असं आर्यन खानचे वकील म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments