Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

म्यानमारमध्ये 'रक्तरंजित रविवार', यंगूनमध्ये 21 आंदोलकांचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 15 मार्च 2021 (17:23 IST)
म्यानमारमधील यंगूनमध्ये झालेल्या हिंसक झटापटीत रविवारी (15 मार्च) एकाच दिवसात किमान 21 आंदोलकांच्या मृत्यूचं वृत्त आहे.
यंगून हे म्यानमारमधील मुख्य शहरांपैकी एक आहे. या शहरातील हलिंग थारयार भागात सुरक्षारक्षकांनी आंदोलन करणाऱ्या लोकांवर गोळीबार केला. त्याचवेळी आंदोलकांनी लाठ्याकाठ्या आणि चाकूचा वापर करत प्रतिकार केला. या हिंसक झटापटीने रक्तरंजित वळण घेतलं.
रविवारचा दिवस यंगू शहरासाठी रक्तरंजित ठरला. यंगूनमध्ये 21 जणांचा मृत्यू, तर देशातील विविध भागात अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
द असिस्टंट असोसिएशन फॉर पॉलिटिकल प्रिजनर्स (AAFP) च्या मॉनिटरिंग ग्रुपच्या अंदाजानुसार, रविवारी देशात किमान 38 जणांचा मृत्यू झाला आहे.
चिनी व्यवसायिकांवरील हल्ल्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांनी या भागात मार्शल लॉची घोषणा केलीय. आंदोलकांचं म्हणणं आहे की, चीनकडून म्यानमारमधील लष्करी अधिकाऱ्यांना समर्थन दिलं जातंय.
 
म्यानमारमध्ये काय सुरू आहे?
एक फेब्रुवारी 2021 रोजी म्यानमारमध्ये लष्कराकडून सत्ता उलथवण्यात आली. म्यानमारमधील सर्वोच्च नेत्या आँग सान सू ची यांच्यासह अनेक नेत्यांना लष्करानं अटक केली. त्यानंतर म्यानमारमध्ये लष्कराला विरोध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत.
सू ची यांच्या एनएलडी पक्षाला गेल्यावर्षी झालेल्या निवडणुकीत मोठा विजय मिळाला होता. मात्र, ही निवडणूक म्हणजे एक मोठा घोटाळा असल्याचं म्यानमारमधील लष्कराचा दावा आहे.
एनएलडीच्या प्रमुख आँग सान स ची यांच्यावर म्यानमार पोलिसांनी अनेक आरोप केले आहेत.
अटकेपासून वाचलेल्या खासदारांनी एक गट स्थापन केलाय. कमिटी फॉर रिप्रेझेंटिंग यूनियम पार्लमेंट (CRPH) असं या गटाला म्हटलं जातं. म्हान विन खाईंग थान हे या कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष निवडले गेलेत.
थान यांनी फेसबुकवरील आपल्या भाषणात म्हटलंय की, "ही वेळ या अंधारलेल्या काळात नागरिकांच्या क्षमतेची चाचणी घेणारी आहे. लोकशाहीसाठी जे लोक दशकांपासून हुकूमशाहीचा विविध प्रकारांचा अन्याय सहन करत आहेत, त्या सगळ्यांच्या प्रयत्नांना एकत्र आणण्याचा आमचा हा प्रयत्न आहे."
लष्करानं म्यानमारमध्ये सत्ता हातात घेतल्यानंतर म्हान विम खाईंग थान यांना बरखास्त केलं होतं. लष्कराला विरोध करणाऱ्या लोकांचं नेतृत्त्व थान करत आहेत.
 
म्यानमारमध्ये एका वर्षाची आणीबाणी
ब्रह्मदेश या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या म्यानमारमध्ये 2011पर्यंत लष्कराचीच सत्ता होती. आँग सान सू ची यांनी ही लष्करी राजवट संपुष्टात आणून लोकशाहीची स्थापना केली.
पण सध्या लष्कराच्या सर्वोच्च कमांडरनं सूत्रं हातात घेतली असून एका वर्षाची आणीबाणी लागू करण्यात आली आहे. देशातील नेत्या आँग सान सू ची यांना ताब्यात घेतलं असून नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी या पक्षाच्या इतरही सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
 
निवडणुकीत काय झालं होतं?
8 नोव्हेंबर 2020 रोजी आलेल्या निकालात नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी पार्टीने 83 टक्के जागा जिंकल्या होत्या. आँग सान सू ची यांच्या बाजूने जनमत असल्याचंच हा विजय सांगत होता. 2011 साली लष्कराची सत्ता संपल्यानंतर झालेली ही दुसरी निवडणूक होती.
मात्र, म्यानमारच्या लष्करानं या निकालावर प्रश्न उपस्थित केले. राष्ट्रपती आणि निवडणूक आयोगाचे अध्यक्ष यांच्याविरोधात लष्करानं सुप्रीम कोर्टात तक्रार दाखल केली.
 
जनरल मिग ऑंग ह्वाइंग कोण आहेत?
म्यानमारमधील सत्ता उलथवल्यानंतर लष्कारातील जनरल मिन आँग ह्वाइंग हे सर्वांत ताकदवान नेते म्हणून पुढे आलेत. 64 वर्षीय ह्वाइंग हे याच वर्षी जुलै महिन्यात निवृत्त होणार होते. मात्र, आणीबाणीच्या घोषणेसोबतच ह्वाइंग यांची म्यानमारवरील पकड अधिक मजबूत झालीय.
इथवर पोहोचण्यासाठी ह्वाइंग यांनी मोठा प्रवास केलाय. लष्करात दोनवेळा प्रवेश मिळवण्यात अपयशी ठरलेल्या ह्वाइंग यांनी तिसऱ्या प्रयत्नात लष्करात प्रवेश मिळवला. त्यानंतर एक एक पायरी वर चढत, ते लष्कराच्या जनरल पदापर्यंत पोहोचले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments