Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑलिम्पिक: मीराबाई चानूला रौप्यपदक

Webdunia
शनिवार, 24 जुलै 2021 (13:00 IST)
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्यपदकावर नाव कोरलं. महिलांच्या 49 किलो वजनी गटात मीराबाईने स्नॅच प्रकारात 87 तर क्लिन अँड जर्क प्रकारात 115 किलो वजन उचललं.
 
2016मध्ये मीराबाई यांच्यासोबत असंच झालं होतं.ऑलिम्पिकमध्ये मीराबाई अशा दुसऱ्या खेळाडू होत्या ज्यांच्या नावासमोर डिड नॉट फिनिश असं लिहिलेलं होतं.
 
जे वजन मीरा सराव करताना सहजपणे उचलत असत, तेच वजन ऑलिम्पिक स्पर्धेत उचलताना जणू त्यांचे हात जखडले होते. त्यावेळी भारतात रात्र असल्यामुळे खूप कमी भारतीयांनी बघितलं.
 
सकाळी उठल्यानंतर भारतातल्या क्रीडाप्रेमींनी जेव्हा ही बातमी वाचली तेव्हा मीराबाई त्यांच्या नजरेत व्हिलन ठरल्या. 2016मध्ये तर त्या डिप्रेशनमध्ये गेल्या आणि दर आठवड्याला त्यांना मानसिक तज्ज्ञांकडून उपचार घ्यावे लागले.
या अपयशानंतर खेळाला रामराम ठोकावा असं एकदा मीराबाई यांच्या मनात आलं. पण त्यांनी माघार न घेता गेल्या वर्षी चांगली कामगिरी केली.
 
48 किलोग्राम वजन असणाऱ्या मीराबाईंनी वजनाच्या 4 पट अधिक म्हणजे 194 किलो इतकं वजन उचलत मागील वर्षी वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं. मागील 22 वर्षांत असा विक्रम करणाऱ्या मीराबाई पहिल्या भारतीय महिला ठरल्या होत्या.
 
48 किलो वजन कायम राहावं यासाठी मीराबाईंनी त्या दिवशी जेवणसुद्धा केलं नव्हतं. याच दिवसाच्या तयारीसाठी मीराबाई मागच्या वर्षी सख्ख्या बहिणीच्या लग्नातही गेल्या नव्हत्या
 
बांबू वापरून वेटलिफ्टिंगचा सराव
8 ऑगस्ट 1994ला मणिपूर इथल्या छोट्या गावात मीराबाई यांचा जन्म झाला. इंफाळपासून त्यांचं गाव 200 किलोमीटर दूर होतं. त्याकाळी मणिपूरच्याच महिला वेटलिफ्टर कुंजुरानी देवी स्टार होत्या आणि अथेन्स ऑलिम्पिकसाठी खेळायला गेल्या होत्या.
 
त्यांचा आदर्श मीराबाईंनी घेतला आणि सहा भावंडांत सर्वांत छोटी असलेल्या मीराबाईंनी वेटलिफेटर बनण्याचा निश्चय केला.
 
भारतीय हॉकी संघाने विजयी सलामी दिली. दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव जोडीने आगेकूच केली आहे. सौरभ चौधरी पात्रता फेरीत दमदार प्रदर्शन करत आहे.
 
मीराबाईंच्या जिद्दीपुढे आई-वडिलांनाही माघार घ्यावी लागली. 2007मध्ये त्यांनी सराव सुरू केला तेव्हा लोखंडाचा बार नसल्यानं त्या बांबूच्या बारनं सराव करत असे.
 
गावात प्रशिक्षण केंद्र नसल्यानं सरावासाठी त्यांना 50-60 किलोमीटर दूर जावं लागायचं. जेवणात चिकन आणि अंडी लागायची. पण सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मीराबाईंना तेही शक्य नव्हतं. पण यामुळे मीराबाई थांबल्या नाही.
वयाच्या 11व्या वर्षी मीराबाई अंडर 15 चॅम्पियन होत्या आणि 17व्या वर्षी ज्युनियर चॅम्पियन. ज्या कुंजुरानी यांना बघत मीराबाईंच्या मनात चॅम्पियन बनण्याचं स्वप्न जागृत झालं त्याच कुंजुरानी यांचा 12 वर्षं जुना विक्रम मीराबाईंनी मोडीत काढला. 192 किलो वजन उचलून.
 
असं असलं तरी प्रवास सोपा नव्हता. कारण मीराबाईंच्या आई-वडिलांजवळ पुरेशी साधनसंपत्ती नव्हती. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र न झाल्यास खेळ सोडावा लागेल, अशी परिस्थिती उद्भवली होती.
 
पण ही वेळ आली नाही. वर्ल्ड चॅम्पियनशिप सोडून मीराबाईंनी ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये सिल्व्हर मेडल जिंकलं होतं.
 
भारताच्या पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक मोहिमेची सुरुवात विजयाने केली.
 
भारताने न्यूझीलंडवर 3-2 असा विजय मिळवला. भारतातर्फे रुपिंदर पाल सिंहने एक तर हरमनप्रीत सिंहने दोन गोल केले.
ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने एक काळ गाजवला. पुरुष हॉकी संघाच्या नावावर तब्बल आठ सुवर्णपदकं आहेत. मात्र 1980 नंतर हॉकी संघाचं सुवर्णपदकाशी असलेलं नातं दुरावलं.
नेमबाजी
सौरभ चौधरी आणि अभिषेक वर्मा हे दोघं 10मीटर एअर पिस्तूल प्रकारात पात्रता फेरीत खेळत आहेत.
टेनिस
सुमीत नागल उझबेकिस्तानच्या डेनिस इस्टोमिनविरुद्ध खेळत आहे. सुमीतने पहिला सेट जिंकला आहे.
बॅडमिंटन
सात्विकसैराज-चिराग शेट्टी यांच्यासह बी.साईप्रणीत ऑलिम्पिक मोहिमेची काही वेळात सुरुवात करतील.
चीनने कमावलं स्पर्धेतलं पहिलं सुवर्ण
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतलं पहिलंवहिलं सुवर्णपदक चीनच्या नेमबाजाने पटकावलं. चीनच्या यांग क्विआनने 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.
रोइंगमध्ये रिपिचेजवर आशा
लाइटवेट डबल स्कल प्रकारात अरविंद सिंह आणि अर्जुन जाट लाल या जोडीला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. ही जोडी रिपिचेजसाठी पात्र ठरली आहे.
तिरंदाजी: दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधवची आगेकूच
दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव ही जोडी उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. दीपिका-प्रवीण जोडीने चायनीज तैपेई जोडीवर 5-3 असा विजय मिळवला.
नेमबाजी: एलाव्हेनिल व्हलावरिनच्या हाती निराशा
महिलांच्या 10मीटर एअर रायफल प्रकारात एलाव्हेनिल व्हालवरिनला अंतिम फेरीसाठी पात्र होता आलं नाही. पात्रता फेरीत तिला 626.5 गुणांची कमाई केली.
टेटे: मनिका-शरथ पराभूत
टेबल टेनिसमध्ये मिश्र प्रकारात चायनीज तैपेईच्या जोडीने शरथ कमाल आणि मनिका बात्रा जोडीवर 11-8, 11-6, 11-5, 11-4 असा विजय मिळवला.
ज्युडो
एलिमिनेशन राऊंडमध्ये भारताच्या सुशीला देवीला पराभवाला सामोरं जावं लागलं. हंगेरीच्या इव्हा सेरनोव्हिझकीने सुशीलाला नमवलं.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

पुढील लेख
Show comments