Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

समुद्रकिनाऱ्यावरील विचित्र मासा Penis Fish कौतुहलाचा विषय

समुद्रकिनाऱ्यावरील विचित्र मासा Penis Fish कौतुहलाचा विषय
, मंगळवार, 17 डिसेंबर 2019 (11:41 IST)
पुरुषाच्या लिंगाप्रमाणे दिसणारे 'पेनिस फिश' हजारोंच्या संख्येने कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर आले आहेत. सतत धडधडणाऱ्या या जीवांना fat innkeeper worms किंवा Urechis caupo असंही म्हणतात. मात्र त्यांचा आकार पाहता, ते एकप्रकारचे जंत असले तरी त्यांना 'पेनिस फिश' असं म्हटलं जातं.
 
पण कॅलिफोर्नियातल्या ड्रेक्स किनाऱ्यावर वादळामुळे हे जीव उघड्यावर आले असतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. हे ठिकाण सॅन फ्रॅन्सिस्कोपासून सुमारे 80 किमीवर आहे.
 
हे जंत स्वतःला वाळूत गाडून घेतात. त्यांचा आकार थोडा विचित्र असला तरी जमिनीखाली राहाण्यासाठी त्यांचा आकार अगदी सुयोग्य आहे, असं जैवशास्त्रज्ञ इवान पार सांगतात. हे जंत 30 कोटी वर्षांपूर्वीही अस्तित्वात होते, असं त्यांच्या जीवाष्मावरून लक्षात येतं. त्यांचं आयुष्य 25 वर्षांचं असतं, असंही ते म्हणाले. हे जंत U आकाराचे खड्डे खणून कित्येक फूट खाली जातात.
 
शार्कसकट अनेक माशांचं हे खाद्य आहे. माणूससुद्धा त्यांचा आपल्या अन्नात समावेश करू शकतो, असं सांगितलं जातं. त्याची एक प्रजाती पूर्व आशियातही सापडते. दक्षिण कोरियासह अनेक देशांमध्ये त्याचं स्वादिष्ट पक्वान्न तयार केलं जातं.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतात गूगलवर सर्वाधिक सर्च झालेली व्यक्तिमत्त्वे