Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Mobile Portability : मोबाईल नंबर तोच ठेवून 3 ते 5 दिवसांमध्ये कंपनी बदलता येणार

Webdunia
बुधवार, 18 डिसेंबर 2019 (16:52 IST)
टेलिफोन ऑथॉरिटी ऑफ इंडिया - म्हणजेच ट्रायने मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठीचे नियम बदलले आहेत. एका सर्व्हिस प्रोव्हायडरकडून दुसऱ्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडे जाताना ग्राहकांना त्रास होऊ नये म्हणून ही पावलं उचलण्यात आली आहे.
 
16 डिसेंबरपासून 'ट्राय'चे नवीन नियम लागू होतील.
 
या नवीन नियमांमुळे आता ग्राहकांना पूर्वीपेक्षा लवकर मोबाईल नंबर आणि कनेक्शन ट्रान्सफर करता येईल. पूर्वी यासाठी 15 दिवस लागायचे. आता 3 ते 5 दिवसांत हे काम होईल.
 
तुमचा नंबर जर 'सेम सर्कल'मध्ये हा नंबर 'पोर्ट' असेल तर 3 दिवसांत हे काम होणं अपेक्षित आहे. जर तुम्ही तुमचा नंबर दुसऱ्या सर्कलमधल्या ऑपरेटरकडे नेत असाल तर हे काम 5 दिवसांत होईल. म्हणजे नंबर पोर्ट करण्यासाठीचा कालावधी 96 तासांवरून आता 48 तासांवर येईल.
 
नंबर पोर्ट करण्याची प्रक्रिया
 
मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP)साठी अर्ज केल्यानंतर संबंधित ग्राहकासाठी एक युनिक पोर्टिंग कोड (Unique Porting Code) (UPC) जनरेट करण्यात येईल.
या ग्राहकाच्या अकाऊंटची (मोबाईल नंबर) तपासणी करण्यात आल्यानंतरच हा UPC जनरेट होईल. या तपासणीसाठी काही निकष असतील.
पोस्ट पेड मोबाईल नंबर असल्यास तुम्हाला MNPसाठी अर्ज करण्यापूर्वी थकित बिल पूर्ण भरावं लागेल. शिवाय तुम्ही सध्याच्या सर्व्हिस प्रोव्हायडरचे किमान 90 दिवसांसाठी ग्राहक असणं गरजेचं आहे.
याशिवाय तुमच्या नंबरसाठी इतर कोणीही दावा केलेला असू नये किंवा या नंबरवरून कोणताही वाद असू नये.
जर या तपासणीतले निकष पूर्ण झाले तर नंबर पोर्ट करण्यासाठीची विनंती स्वीकारण्यात येईल आणि युनिक पोर्टिंग कोड जनरेट केला जाईल.
मोबाईल ग्राहकाला स्वतःच हा युनिक पोर्टिंग कोड जनरेट करता येईल.
नंबर पोर्ट करण्याची विनंती केल्याच्या 5 मिनिटांतच हा UPC येईल.
UPC जनरेट करण्यासाठी SMS पाठवावा लागेल. PORT (SPACE) (मोबाईल नंबर) असं लिहून 1900 ला पाठवा.
SMSवरच हा पोर्टिंग कोड मिळेल. हा कोड पुढचे 4 दिवस वैध असेल. फक्त जम्मू-काश्मीर, आसाम आणि ईशान्येकडच्या राज्यांत या कोडची वैधता 30 दिवस असेल.
यानंतर ग्राहकांना ज्या मोबाईल कंपनीची सेवा सुरू करायची आहे त्या कंपनीला ओळखपत्रं आणि रहिवास दाखला द्यावा लागेल.
यासोबतच कस्टमर अॅक्विझिशन फॉर्म (CAF) भरताना त्यामध्ये हा पोर्ट कोड नमूद करावा लागेल शिवाय KYC देखील पूर्ण करावी लागेल.
हे सर्व टप्पे पार नवीन सिम मिळू शकेल.
कॉर्पोरेट मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठीच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या मोबाईल नंबर पोर्टिंगसाठी ग्राहकांना 6.40 रुपये फी आकारली जाईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments