विकीलिक्सचे सहसंस्थापक ज्युलियन असांज यांना लंडन इथल्या इक्वेडोर देशाच्या दुतावासात अटक केली आहे.
सात वर्षांपुर्वी असांज यांनी आपली अटक टाळण्यासाठी या दुतावासात आश्रय घेतला होता.
त्यांच्यावर एका महिलेच्या लैंगिक छळाचा आरोप होता, त्यामुळे अटक होऊन त्यांना स्वीडनकडे त्यांना प्रत्यार्पित करावं लागलं असतं, असे होऊ नये म्हणून त्यांनी एक्वेडोरच्या लंडनस्थित दुतावासात आश्रय घेतला.
पण आता त्यांच्याविरोधातला लैंगिक छळाचा आरोप मागे घेण्यात आला आहे.
असांज यांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांना वेस्टमिंस्टर कोर्टासमोर हजर करण्यात येईल असं लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सांगितलं.
कोर्टात हजर न राहिल्याने त्यांना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष लेनिन मोरेनो यांनी म्हटलं की असांज यांनी सतत आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्यांचा राजाश्रय आम्ही काढून घेत आहोत.