rashifal-2026

Sharadiya Navratri 2025 जागृत श्री मनोरमा देवी मंदिर देवाळ गुजरात

Webdunia
रविवार, 21 सप्टेंबर 2025 (07:30 IST)
India Tourism : नवरात्रीचे पवित्र पर्व सुरु होत आहे. या नऊ दिवसांमध्ये देवीची आराधना केली जाते. तसेच अनेक भक्त आपल्या कुलस्वामिनीची मनोभावे आराधना करतात व घट स्थापित करतात. तर अनेक जण आपल्या कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी जातात. भक्त या नऊ दिवसांमध्ये देवीच्या मंदिरांमध्ये जाऊन देवीआईचे आशीर्वाद घेतात. तसेच आज आपण अश्याच एक देवीच्या जागृत मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत. गुजरात  राज्यातील तापी जिल्ह्यातील निझर तालुक्यात असलेले छोटेसे गाव देवाळ. या देवाळ  गावात मनोरम देवीचे अतिशय सुरेख असे मंदिर आहे. नवसाला पावणारी देवी असे देवीचे जागृत मंदिर प्रसिद्ध आहे. हिरव्यागार डोंगरांमध्ये स्थापित हे मंदिर खूप सुंदर आणि आकर्षक आहे.    
 
श्री मनोरमा देवी मंदिर- 
गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील निझर तालुकामधील देवाळ गावात वसलेले मनोरमा माता मंदिर हे एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे. अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी असलेली मनोरमा देवी ही शक्तीची देवता असून आरोग्य, संरक्षण आणि कुटुंब सुखासाठी देवीची पूजा केली जाते. तसेच हे मंदिर आदिवासी समाजासाठी विशेष महत्वाचे असून, निसर्गरम्य भागात वसलेले आहे. मंदिराच्या जवळचा परिसर हिरवा आणि शांत आहे. तसेच देवीचे मंदिर नंदुरबार सीमेजवळ असल्याने महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील भाविकांसाठी सोयीचे आहे.
ALSO READ: सिद्धीदात्री देवी मंदिर सागर
श्री मनोरमा देवी मंदिर महत्व-
हे मंदिर प्राचीन असून, आदिवासी परंपरेशी जोडलेले आहे. स्थानिक कथा प्रमाणे, मनोरमा देवीने या भागातील लोकांना संकटातून वाचवले, त्यामुळे ते जागृत देवस्थान मानले जाते. मंदिराची स्थापना शतकांपूर्वी झाली असावीअसे सांगण्यात येते. मनोरमा देवीची प्रतिमा ही शिळा रूपातीलअसून, तिची पूजा मनःशांती आणि समृद्धीसाठी केली जाते. तसेच नवरात्रोत्सवात येथे मोठा मेळा भरतो. आदिवासी समाजासाठी हे कुलदेवता स्थान आहे. येथे येणारे भाविक निसर्ग, अध्यात्म आणि सांस्कृतिक अनुभव घेतात.
 
मंदिराची वैशिष्ट्ये-
मंदिर साधे पण सुंदर आहे. पूर्वी हे मंदिर प्राचीन होते आता या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून सुंदर असे बांधकाम करण्यात आले आहे. देवीची मूर्ती आकर्षक असून, आसपास तापी नदी, जंगल आणि डोंगररांगा आहे. मंदिर परिसरात छोटीशी बाग असून महादेवाचे शिवलिंग स्थापित आहे. नवसाला पावणारी मनोरम देवी आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी उभी असते. 
ALSO READ: भारतातील पाच प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर
श्री मनोरमा देवी मंदिर देवाळ गुजरात जावे कसे?
रस्ता मार्ग-श्री मनोरमा देवी मंदिर देवाळ हे गाव निझर शहरापासून १५  किमी अंतर आहे. निझर आणि  देवाळ रोडवरून MSRTC किंवा GSRTC बस व खासगी वाहनाने काही मिनिटांत मंदिरापर्यंत पोहोचता येते.  
रेल्वे मार्ग- देवाळ गावाजवळी जवळील सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन नंदुरबार असून १७ किमी अंतरावर आहे. स्टेशनवरून खासगी वाहन किंवा बसने मंदिरापर्यंत पोहचता येते. 
विमान मार्ग- मंदिरापासून सर्वात जवळचे सूरत विमानतळ असून ते १७० किमी अंतरावर आहे. 
ALSO READ: Sharadiya Navratri 2025 : खान्देशची कुलदेवी जागृत श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिर जळगाव

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ओ रोमियो ट्रेलर लाँचवर नाना पाटेकर नाराज, शाहिद आणि तृप्ती उशिरा पोहोचल्याने कार्यक्रम सोडून गेले

"मला वाटेल तेव्हाच मी मराठी बोलेन..." हिंदी विरुद्ध मराठी भाषेच्या वादावर सुनील शेट्टी म्हणाले

स्मृती इराणी यांनी दावोस २०२६ मध्ये भारताचा लिंग समानता अजेंडा सादर केला

'धुरंधर २' मध्ये आणखी एक शक्तिशाली अभिनेता दिसणार, विकी कौशल मेजर विहानची भूमिका साकारणार

शेफाली जरीवालावर काळी जादू करण्यात आली होती! पती पराग त्यागीचा दावा

सर्व पहा

नवीन

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला अटक

पलाश मुच्छल एका मुलीसोबत बेडवर पकडला गेला होता, महिला क्रिकेटपटूंनी मारहाण केली होती, स्मृतीच्या मित्राने केला खुलासा

"बॅटल ऑफ गलवान" मधील "मातृभूमी" या पहिल्या गाण्याचा टीझर प्रदर्शित

Beautiful And Peaceful Ashrams India भारतातील सर्वात शांत आणि सुंदर आश्रम

चित्रपट Border 2 ला जबरदस्त रिस्पॉन्स

पुढील लेख
Show comments