Dharma Sangrah

साप्ताहिक राशीभविष्यफल

वेबदुनिया
मेष : घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. घरातील वातावरण आनंदी, उत्साही, राहील. कामानिमित्त प्रवास घडतील. संततीची उन्नती होईल. उत्साहवर्धक घटना घडल्याने तरुण-तरुणी आनंदात राहतील. नवीन ओळखी होतील. व्यवसाय-उद्योगात नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. चंद्राचा बुध, शुक्र, शनिशी त्रिकोणयोग तर मंगळाशी प्रतियोग होत आहे. महत्वाचे निर्णय आपल्या सल्ल्याने घेतले जातील. आपले अंदाज अचूक ठरतील.  

वृषभ : मिळालेल्या संधीचा लाभ आपल्या भविष्य उज्‍जवल करणारा राहील. उत्तरार्धात आगंतुक पाहुणो येण्याची शक्यता राहते. लेखकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. नवोदित कलाकारांना चांगल्या संधी लाभतील. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या धनस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. जूनी येणी वसूल होतील. भविष्यकाळाच्यादृष्टीने गुंतवणूक करणे शक्य होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील.  

मिथुन : तरुणांना सुसंधीचा लाभ मिळेल. लेखक, साहित्यीक, कवी, कलाकार यांना सुसंधी लाभतील. गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून फायदा होईल. व्यावसायिक उपक्रम डोळ्यासमोर ठेवून आधुनिक उपक्रम राबविले जातील. नव्या आशा पल्लवीत होतील. अनुकूल व्यक्तींशी संपर्क साधण्यात यश येईल. आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल.  

कर्क : सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. उत्तरार्धात उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायात आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करु शकाल. अपेक्षित गाठीभेटी झाल्याने मन प्रसन्न होईल. आपले मनोबल वाढेल.. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील. अनेक कामातून सफलता मिळणार आहे. भावंडांशी सुसंवाद साधाल.  

सिंह : उत्साह व उमेद वाढेल. बौद्धीक व कला क्षेत्रातून चांगला फायदा होईल. आर्थिक क्षेत्रातील निर्णय योग्य ठरणार आहेत. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा लागेल. दुसर्‍यांकडून काम करुन घेण्यात यशस्वी व्हाल. उत्तरार्धात आपण हाती घेतलेल्या कामात यश मिळण्यासाठी आपल्याला थोडे थांबावे लागणार आहे. महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील. राजकीय क्षेत्रात आपले वर्चस्व वाढेल. नव्या जोमाने कामाला लागाल.  .

कन्या : व्यवसाय उद्योगात वापरलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपणांस लाभदायक राहील. सरकारी कामात प्रगती करणारा आहे. व्यवसाय उद्योगात आशावादी धोरण स्वीकारा. कोर्टातील कामात प्रगती होईल. सामाजिक कार्यात आपल्याला योग्य प्रतिसाद मिळेल. समाजात आपल्या मतांचा आदर होईल. कल्पनाशक्तीला वाव देणार्‍या घटना घडतील. जबाबदारीची कामे स्वीकारावी लागतील.  

तूळ : हउद्योग अथवा जोडधंद्यातून फायदा होईल. व्यावसायिक उपक्रम डोळ्यासमोर ठेवून आधुनिक उपक्रम राबविले जातील. नव्या आशा पल्लवीत होतील. मोठय़ा व्यक्तींच्या मदतीने उद्योग, नोकरीत उत्कर्ष करणार्‍या घटना घडतील. अवघड कामे सहजतेने मार्गी लागतील. लेखक, साहित्यीक, कवी, कलाकार यांना सुसंधी लाभतील. गृलांबच्या प्रवासाचे योग येतील. चांगल्या व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. नव्या उमेदीने कामाला लागाल.  

वृश्चिक : व्यवसायत उद्योगातून चांगली प्राप्ती होईल. व्यवसाय उद्योगात अभिनवपूरक तंत्र वापरले तर चांगली भरभराट होईल. सार्वजनिक संबंधाच्या प्रश्नांशी सतत संबंध येतील. जूने मित्र भेटतील. अचनाक अनावश्यक खर्च उद्भवतील. कामानिमित्तच्या घडणार्‍या प्रवासात अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे. मानसिक ताणतणाव जाणविण्याची शक्यता राहते. पूर्वनियोजित प्रवासात काही कारणाने विलंब होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकीतून लाभ होतील.  

धनु : प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. व्यवसायीक उद्योगातील कामानिमित्त कर्ज प्रकरण रखडले असेल तर ते मार्गी लागेल. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. नवीन व्यावसायिक करार घडतील. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. अंध:श्रद्धेला बळी पडू नका. प्रवासात आपले खिसापाकिट सांभाळावे. शुभदिनांक २.

मकर : आपल्या मतांचा आदर केला जाईल. विश्‍वास आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेत तर इतरांची मदतही तुम्हाला होईल. मनातील कल्पना आकारात घेतील. ज्या लोकांमुळे तुम्ही अडचणीत येता, अशा लोकांपासून आज लांब रहा. कुणीतरी तुम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. उत्तरार्धात कामानिमित्त दूरचे प्रवास घडून येतील. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या षष्ठस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. मातुल घराण्यातील व्यक्तींशी सुसंवाद साधाल.  

कुंभ : कार्यक्षेत्रात विविध संधी उपलब्ध होतील. महत्त्वाचे निर्णय घेताना अतिशय विचारपूर्वक अथवा योग्य व्यक्तीच्या सल्ल्यानेच घ्यावेत. पूर्वी झालेली दिशाभूल निस्तरण्यात वेळ जाईल. महत्त्वाच्या निर्णयात वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे.उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेले. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल. एखादा निर्णय अनपेक्षितपणे झटपट घेतला जाईल. व भविष्यात त्याचा उपयोग होईल. 

मीन : सतत पाहुण्यांची वर्दळ राहील. मित्र परिवाराची भेट होईल. संततीच्या प्रगतीमुळे आपली पत वाढणार आहे. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील. घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता महिला नवीन खरेदीचे मनसुबे आखतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती साधता येईल. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या बोलण्याचा चांगला प्रभाव टाकणारा आहे. तरुणांना सुसंधीचा लाभ मिळेल. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

अधिकमासात मृत्यू होणे शुभ की अशुभ? पुरुषोत्तम मासातील मृत्यूचे गूढ!

Guru Gorakhnath prakat din 2026 wishes in Marathi भगवान श्री गोरक्षनाथ प्रकटोत्सव निमित्त शुभेच्छा

मंगळवारी चुकूनही करू नका या गोष्टी; मान्यता काय सांगते?

आरती मंगळवारची

Mohini Ekadashi 2026 मोहिनी एकादशी कधी? पूजा विधी आणि या मंत्रांनी प्रभू विष्णूंना प्रसन्न करा

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

पुढील लेख
Show comments