Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'आदिपुरुष’ला वाईट चित्रपट म्हणणाऱ्या व्यक्तीला प्रभासच्या चाहत्यांची बेदम मारहाण, व्हिडीओ होतोय व्हायरल

 Adipurush
Webdunia
शुक्रवार, 16 जून 2023 (21:52 IST)
क्रिती सेनॉन आणि प्रभासचा बहुचर्चित चित्रपट ‘आदिपुरुष’ चित्रपट आज (१६ जून) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंगही हाऊसफुल्ल झाले होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता हळूहळू याबाबत प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी या चित्रपटाबाबत सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, चित्रपटाबाबत नकारात्मक प्रतिक्रिया देणाऱ्या एका व्यक्तीला प्रभासच्या चाहत्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 
दरम्यान मारहाण झालेल्या व्यक्तीने ‘आदिपुरुष’ चित्रपटाबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, निर्मात्यांनी चित्रपटात प्ले स्टेशन गेममधील सर्व राक्षस टाकले आहेत असं वाटतं. चित्रपटात हनुमान,आणि काही 3D शॉट्सशिवाय काहीही नाही. एवढंच नाही तर प्रभास ‘श्रीरामांच्या गेटअपमध्ये अजिबात शोभत नाही. बाहुबलीमधील त्याचा लूक खूप छान होता. त्यात तो राजासारखा दिसत होता, पण ओम राऊत यांनी प्रभासला योग्य पद्धतीने चित्रपटात दाखवलं नाही, असंही म्हणताना तो दिसत आहे.
 
चित्रपटाबाबत दिलेली ही नकारात्मक प्रतिक्रिया प्रभासच्या चाहत्यांना आवडली नाही. त्यांनी कॅमेरासमोरच त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढंच नाही तर प्रभासचे चाहते आणि त्या व्यक्तीमध्ये वादावादी झाल्याचेही पाहायला मिळाले. या व्हिडीओवर नेटकरी मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिलं, “एवढं खरं नव्हतं बोलायचं.” दुसऱ्या युजरने रामाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे चाहते, रावणाच्या भक्तांसारखे वागतात.” म्हणत टीका केली आहे. तर एका युजरने मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
 
रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन व सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. प्रभासने या चित्रपटात श्रीराम तर क्रिती सेनॉनने सीता मातेची भूमिका साकारली आहे. सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहे. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने हनुमान तर अभिनेत्री तेजस्विनी पंडीत श्रृपनखेच्या भूमिकेत आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rani Mukerji: व्यावसायिक चित्रपटांव्यतिरिक्त राणी मुखर्जीने साकारल्या या भूमिका

चंदू चॅम्पियनसाठी कार्तिक आर्यन महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित

'टेस्ट' चित्रपटाचा नवीन टीझर प्रदर्शित, आर माधवनची व्यक्तिरेखा उघड

Orry वर वैष्णोदेवी बेस कॅम्पमध्ये दारू पिल्याचा आरोप, मंदिराजवळ दारू आणि मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर २ महिन्यांसाठी बंदी

‘ये रे ये रे पैसा ३’ चित्रपट १८ जुलैला होणार प्रदर्शित

सर्व पहा

नवीन

अक्षय कुमारच्या केसरी 2 चा टीझर प्रदर्शित, जालियनवाला बाग हत्याकांडाची कहाणी दाखवली जाणार

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

इमरान हाश्मीची पत्नी परवीन त्याला तिच्यासाठी अनलकी मानते, कारण जाणून घ्या

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आई आयसीयूमध्ये दाखल

नवऱ्याची २१ कर्तव्ये

पुढील लेख
Show comments