Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेता आदित्य सिंग राजपूतचा ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे मृत्यू, बाथरूममध्ये मृतदेह सापडला

Webdunia
सोमवार, 22 मे 2023 (17:20 IST)
Instagram
नवी दिल्ली : लोकप्रिय अभिनेता, मॉडेल आणि कास्टिंग डायरेक्टर आदित्य सिंग राजपूत याचे निधन झाले आहे. त्याचा मृत्यू अत्यंत गूढ पद्धतीने झाला आहे. सोमवार 22 मे 2023 रोजी तो त्याच्या घराच्या बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळला. मित्र आणि इमारतीच्या चौकीदाराने त्याला रुग्णालयात नेले. जिथे अभिनेत्याला मृत घोषित करण्यात आले. वृत्तानुसार, अभिनेत्याचा मृत्यू ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे झाला असावा.
 
'स्प्लिट्सविला' आणि   'गंदी बात' व्यतिरिक्त इतर अनेक टीव्ही शोमध्ये दिसलेला अभिनेता आदित्य सिंग राजपूत याचे निधन झाले आहे. 22 मे रोजी दुपारी तो अंधेरी येथील त्याच्या घरातील बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळला. आदित्यच्या मित्राने त्याचा मृतदेह बाथरूममध्ये पाहिला. आदित्य सिंग राजपूत हा अंधेरी येथील इमारतीच्या 11 व्या मजल्यावर राहत होता. आदित्यसिंग राजपूतचा मृतदेह बाथरूममध्ये पाहिल्याबरोबर मित्राने लगेच खाली उतरून इमारतीच्या चौकीदारासोबत वरचा मजला गाठला.
 
दिल्लीत जन्मलेल्या, वयाच्या17  व्या वर्षी करिअरला सुरुवात केली
आदित्य सिंग राजपूतचा जन्म दिल्लीत झाला. मात्र, त्यांचे कुटुंब मूळचे उत्तराखंडचे आहे. वयाच्या 17 व्या वर्षी मॉडेलिंग करिअरची सुरुवात करणाऱ्या आदित्यला त्याच्या कुटुंबात आई-वडिलांशिवाय एक मोठी बहीण आहे. लग्नानंतर त्यांची बहीण अमेरिकेत शिफ्ट झाली.
Edited by : Smita Joshi 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Look Back Entertainment 2024: गुगलवर जगभरात सर्वाधिक सर्च केली जाणारी सेलिब्रिटी बनली हिना खान

सलमान खान साऊथमध्ये खळबळ उडवणार,या सुपरस्टारच्या चित्रपटात दिसणार

हैदराबाद येथील घरातून अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांनी केली अटक

रणबीर कपूरने 'ब्रह्मास्त्र' आणि 'ॲनिमल'च्या सिक्वेलचे अपडेट दिले

लग्नानंतर स्त्रियांचं आयुष्य संपत नाही तर...; कथानक ऐकताच मालिकेसाठी होकार दिला

सर्व पहा

नवीन

एक मुलगी खुप घाई घाईने कुठेतरी चाललेली असते

मित्राच्या रुम वर ग्रुप स्टडी करत होतो

राजश्री प्रॉडक्शन स्टुडिओला आग, जीवितहानी नाही

डिसेंबरमध्ये 20 हजार रुपयांच्या आत चांगल्या ठिकाणी भेट द्या, हे टूर पॅकेज बघा

Sexiest Man म्हणून निवडले गेले होते झाकीर हुसेन, अमिताभ बच्चनला मागे सोडले होते

पुढील लेख
Show comments