Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेता दलिप ताहिल साकारणार ‘मुकर्रब खान’

Webdunia
सोमवार, 15 जानेवारी 2024 (14:27 IST)
अभिनेता दलिप ताहिल हे नाव  घेतलं की, त्यांनी साकारलेल्या असंख्य वैविध्यपूर्ण भूमिका डोळयासमोर येतात. हिंदी चित्रपटांचा पडदा गाजविल्यानंतर आता मराठी चित्रपटातही ते एका खलनायकी भूमिकेतून आपल्या समोर येणार आहेत. २६ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘छत्रपती संभाजी’ या  चित्रपटात ते मुघल सरदार ‘मुकर्रब खान’ ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. 
 
छत्रपती संभाजी महाराजांना पकडून मुघल सल्तनतीपुढे हजर करेल अशी प्रतिज्ञा करणारा मुघल सरदार मुकर्रब खान हा औरंगजेबाचा नातेवाईक. शेख निजाम अर्थात मुकर्रब खानाने संभाजी राजांना कपटाने पकडून औरंगजेबाच्या स्वाधीन केले. त्याबद्दल त्याला मुघल दरबारात मोठा मान मिळाला. ‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी ऐतिहासिक भूमिका मला करायला मिळाली. या चित्रपटातील क्रूर मुकर्रब खानची भूमिका करणं माझ्यासाठी चॅलेंजिंग व वेगळा अनुभव असल्याचं दलिपजी सांगतात.  
 
राकेश सुबेसिंह  दुलगज यांनी 'छत्रपती संभाजी' चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केलं आहे. ‘परफेक्ट प्लस एंटरटेनमेंट’ आणि ‘एजे मीडिया कॉर्प’ प्रस्तुत हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजी मध्ये २६ जानेवारीला एकाच वेळी प्रदर्शित होत आहे.   
 
या चित्रपटात प्रमोद पवार, शशांक उदापूरकर,रजित कपूर, मृणाल कुलकर्णी, मोहन जोशी, भरत दाभोळकर, लोकेश गुप्ते, बाळ  धुरी, दिपक शिर्के,अमित देशमुख, कै. आनंद अभ्यंकर,समीर,मोहिनी पोतदार, प्रिया गमरे आदी कलाकार आहेत.    
 
'छत्रपती संभाजी' चित्रपटाची सहनिर्मिती एफआयएफ निर्मिती संस्थेची आहे. कथा  सुरेश चिखले यांची आहे. अविनाश विश्वजित, गुरु शर्मा आणि आरव यांचे संगीत चित्रपटाला लाभले असून पार्श्वसंगीत अमर-अमित देसाई यांनी  दिले आहे. छायांकन सुरेश देशमाने तर संकलन भरत भाई यांचे आहे. कला अनिल वठ यांची आहे. साहसदृश्ये पी. सतीश यांची आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

महाराज'मध्ये दमदार पदार्पणाबद्दल जुनैद खान म्हणतो :‘मला अजून खूप मोठा प्रवास करायचा आहे आणि खूप काही सुधारायचं आहे’

Director Venugopan Passed Away : मल्याळम उद्योगातील प्रसिद्ध दिग्दर्शक वेणुगोपन यांचे निधन

सोनाक्षी-झहीरचं लग्न 23 जूनला नाही...' शत्रुघ्न सिन्हा यांनी दिले मोठे अपडेट

चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी प्रकरणात दोघांना अटक

Vikrant Massey: शांघाय फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'बारावी फेल'चे स्पेशल स्क्रिनिंग होणार

पुढील लेख
Show comments