Marathi Biodata Maker

अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात दाखल

Webdunia
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2024 (10:47 IST)
बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागली असून ते जखमी झाले आहे. सदर घटना पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली. गोविंदा सकाळी कोलकात्याला जात असताना हा अपघात झाला. असे बोलले जात आहे की तो त्याचे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर साफ करत असताना हा अपघात झाला.
 
अभिनेत्याला क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अभिनेता सध्या आयसीयूमध्ये असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे

गोविंदाच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता व शिवसेना नेता गोविंदा कोलकात्याला जाण्याची तयारी करत असताना परवाना असलेले रिव्हॉल्व्हर ठेवत असताना गोळी सुटून त्यांच्या पायाला लागली. त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले असून डॉक्टरांनी त्यांच्या पायातील गोळी काढली आहे. त्यांची प्रकृती बरी आहे.सध्या ते रुग्णालयात आहे. 
गोविंदा यांनी  शोला और शबनम', 'राजा भैया', 'चलो इश्क लड़ाएं', 'जोरू का गुलाम', 'हीरो नंबर 1', 'बेटी नंबर 1', 'घर घर की कहानी' यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांनी दिग्दर्शक डेव्हिड धवनसोबत सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

मास्टरशेफ इंडियाचा विजेता पंकज भदौरियाला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान

जावईबापूंचे प्रकार

आकाश ठोसरसोबतच्या नात्यावर आणि 'सैराट'च्या मानधनावर रिंकू राजगुरूने दिलं उत्तर

दिपाली सय्यदला फोनवरून धमक्या; अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

बजेट ट्रॅव्हलर्ससाठी गोव्यातील या ५ ऑफबीट जागा; गर्दीशिवाय घ्या निसर्गाचा आनंद!

पुढील लेख
Show comments