Festival Posters

अभिनेत्री राधिका‘मिसेस अंडरकव्हर’ओटीटीवर झळकणार

Webdunia
शनिवार, 11 मार्च 2023 (08:12 IST)
स्वतःच्या दमदार अभिनयाच्या बळावर वेगळी ओळख निर्माण करणाऱया राधिका आपटे हिचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्रीच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. राधिका आता लवकरच ‘स्पाय एजंट’च्या भूमिकेत दिसून येणार आहे. राधिकाचा हा चित्रपट कॉमेडी धाटणीचा असणार आहे. अनुश्री मेहता यांच्याकडून दिग्दर्शित आगामी चित्रपट मिसेस अंडरकव्हर’मध्ये राधिका ही दुर्गा नावाची भूमिका साकारत आहे. ही व्यक्तिरेखा स्पाय एजंट असल्याची पार्श्वभूमी यात दर्शविण्यात आली आहे. राधिकासोबत या चित्रपटात सुमित व्यास तसेच राजेश शर्मा हे कलाकार दिसून येणार आहेत. या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासह त्यांना मजबूत करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. हा चित्रपट एक मल्टीटास्कर हाउस वाइफची कहाणी मांडणारा असून जी घरातील कामं करण्यासह अत्यंत उत्तमप्रकारे हेरगिरी करत असल्याचे दिग्दर्शिका अनुश्री मेहता यांनी सांगितले आहे. राधिका आपटेचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म झी5 वर प्रदर्शित होणार आहे. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती

सर्व पहा

नवीन

बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली मुलाच्या कबरीजवळ ढसाढसा रडली

Tourism for Mother's Day मदर्स डे निमित्त आईसोबत वेळ घालवण्यासाठी मुंबईत अनेक उत्तम ठिकाणे

कंगना रणौतचा 'भारत भाग्य विधाता' हा चित्रपट या तारखेला प्रदर्शित होत आहे

Akshay Kumar Eye Surgery चित्रपटांच्या सततच्या शूटिंगमधून अक्षय कुमारने घेतला ब्रेक, कारण आहे तरी काय?

दीपिका पदुकोणपासून प्रियांका चोप्रापर्यंत, बॉलिवूड अभिनेत्री कशाप्रकारे बदलाचा आवाज बनत आहे?

पुढील लेख
Show comments