Festival Posters

अजय देवगण आता फुटबॉलच्या मैदानात

Webdunia
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 (17:09 IST)
अजय देवगणचा बहुप्रतीक्षित 'मैदान'चा टीझर पोस्टर रिलीज झाला आहे. या पोस्टरमध्ये कोणाचाही चेहरा दिसत नाही. केवळ चिखलामध्ये काही युवकांचे बरबटलेले पाय दिसत आहेत. हे युवक चिखलामध्ये फुटबॉल खेळत असल्याचे लगेचच ओळखायला येते. या सिनेमात अजय देवगण व्यतिरिक्त प्रियामणी, गजराज राव आणि बोमन इराणीही असणार आहेत.
 
अमित रवींद्रनाथ शर्मांनी या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. 27 नोव्हेंबर रोजी 'मैदान' रिलीज होणार आहे. प्रियामणिने यापूर्वी मनोज वाजपेयीबरोबर 'द फॅमिली मॅन' या वेबसीरिजमध्ये मनोजच्या पत्नीचा रोल केला होता. पण हिंदी चित्रपटात हे तिचे पदार्पण असेल. अजय देवगण हा अब्दुल रहिम नावाच्या फुटबॉल कोचचा रोल करत असणार आहे. सध्या अजचा 'तानाजी' फुल फॉर्मात सुरू आहे. त्याने कंगना राणावतच्या 'पंगा'ला धोबीपछाड दिली आहे. त्याच्या यशाचा आलेख अजूनही चढताच आहे.
 
कबड्डी, क्रिकेट, बॉक्सिंग, कुस्तीवर सिनेमा येऊन गेला आहे. आता केवळ फुटबॉल शिल्लक राहिला होता. त्यात अजने ही कसर भरून काढली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्मेंद्र यांच्या मृत्युपत्रातून उघड झाले मोठे रहस्य: मुलांना वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा मिळाला नाही

माधुरी दीक्षितच्या 'मिसेस देशपांडे' या शोचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सिद्धांत चतुर्वेदी भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्ही. शांतारामची भूमिका साकारणार, पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

बॉर्डर 2' मधील दिलजीत दोसांझचा पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

श्रेयस अय्यर मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात

सर्व पहा

नवीन

सलमान खानने आमिर खानच्या चित्रपटाची घोषणा शेअर केली

गर्दीत आर्यन खानने केले असे अश्लील कृत्य, पोलिसात तक्रार दाखल

संगीत देवबाभळी फेम अभिनेत्री शुभांगी सदावर्ते पुन्हा विवाहबंधनात अडकली

सारा खानने सुनील लहरीचा मुलगा क्रिश पाठकसोबत हिंदू पद्धतीने केला दुसरा विवाह

'धडक २' साठी सिद्धांत चतुर्वेदीला पुरस्कार, अभिनेत्याने ऑनर किलिंग पीडित सक्षम ताटे यांना समर्पित केला

पुढील लेख
Show comments