Festival Posters

आता अर्जुन साकारणार निगेटिव्ह रोल?

Webdunia
सिद्धार्थ मल्होत्राचा 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या एक व्हिलन या चित्रपटाच्या सिक्वलबाबत सध्या बॉलिवूडमध्ये विविध चर्चा रंगत आहे. मोहित सुरी दिग्दर्शित होणार्‍या या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये अर्जुन कपूरला सिद्धार्थ मल्होत्राच्या जागी रिप्लेस करण्यात आल्याचे समजते. या चित्रपटाला मोहित सुरी डायरेक्ट करणार आहेत, तर एकता कपूर प्रोड्यूस करणार आहे. दरम्यान, चित्रपटासंबंधित एका व्यक्तीने या वृत्तामध्ये तथ्य नसल्याचे सांगितले. या चित्रपटाच्या प्रोड्यूसर्सने सिद्धार्थ आणि अर्जुन या दोघांची भेट घेतली असून सिद्धार्थ मल्होत्राला या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारण्यासाठी अप्रोच केले आहे. तर अर्जुन कपूर निगेटिव्ह भूमिका साकारण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप काहीही निश्चित झाले नसून या दोन्ही कलाकारांशी चित्रपटाबाबत प्राथमिक चर्चा सुरू आहे. सिद्धार्थ मल्होत्रा सध्या लखनौमध्ये त्याच्या आगामी जबरिया जोडाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत सिंह करत आहे. तर चित्रपटात परिणिती चोप्रा मुख्य हिरोईन आहे. दुसरीकडे अर्जुनकपूर त्याच्या नमस्ते इंग्लंड चित्रपटाच्या प्रोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या नमस्ते लंडनचा सिक्वल असून त्याचे दिग्दर्शन विपुल अमृतलाल शाह यांनी केले आहे. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

The Italy of India महाराष्ट्रातील या हिल स्टेशनला भारताचे इटली म्हटले जाते

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

पुढील लेख
Show comments