suvichar

भूमी ग्लॅमरस रूपात!

Webdunia
गुरूवार, 17 जानेवारी 2019 (00:25 IST)
हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या ज्या र्‍हाटोळ्या तारका चकत आहेत त्याध्ये राधिका आपटे आणि भूमी पेडणेकर यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. कोणत्याही बड्या कलाकाराची साथ नसताना दोघींनीही अतिशय सुंदर चित्रपट करून स्वतःला अभिनेत्री म्हणून प्रस्थापित केले आहे. 'दम लगाके हईशा'सारख्या चित्रपटात लठ्ठ वधूची भूमिका करून जगावेगळ्या पद्धतीने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार्‍या भूमीचे तर विशेषच कौतुक आहे. पहिल्या चित्रपटातील नॉनग्लॅमरस रूप पालटून ती आता चांगलीच स्लिम आणि अधिक सुंदर दिसू लागली आहे. आपले अनेक फोटो ती इन्स्टाग्रामवरही शेअर करीत असते. आताही तिने स्वतःचे काही नवे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. भूमी सध्या करण जोहरच्या मल्टिस्टारर 'तख्त'मध्ये भूमिका करीत आहे. यापूर्वी ती 'लस्ट स्टोरीज'मध्ये दिसून आली होती. विशेष म्हणजे तिने आतापर्यंत जेचित्रपट केले ते सर्व हिट झाले आहेत. 'दम लगाके हईशा', 'टॉयलेट : एक प्रेमकथा', 'शुभमंगल सावधान'ला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. आता ती अभिषेक चौबे दिग्दर्शित 'सोनचिरैया' या चित्रपटातही प्रमुख भूमिकेत दिसून येईल. यामध्ये तिच्यासमवेत सुशांतसिंह राजपूत आहे. 
 
भूमीला अक्षयकुार वगळता बड्या कलाकाराबरोबर काम करण्याची संधी मिळालेली नसली तरी बड्या बॅनरची साथ मात्र मिळालेली आहे. यशराज बॅनरच्याच चित्रपटातून तिने पदार्पण केले होते आणि आता धर्मा प्रॉडक्शनच्या 'तख्त'मध्ये ती काम करीत आहे. 
 
धीमेपणाने, पण तिची कारकीर्द आता चांगली आकाराला येत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, आनंदाची बातमी शेअर केली

Bigg Boss Marathi 6 Winner तन्वी कोलते ठरली विजेती! ट्रॉफीसह जिंकली लाखो चाहत्यांची मने

धुरंधर २' ने इतिहास रचला, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला

'टाईम' मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश; यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता

अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण

सर्व पहा

नवीन

करण जोहरने 'कभी अलविदा ना कहना'बद्दल एक मोठी घोषणा केली

३३ वर्षांनंतर 'खलनायक रिटर्न्स', संजय दत्तने नव्या चित्रपटाची घोषणा केली, निर्मात्यांनी फर्स्ट लूक व्हिडिओ प्रदर्शित केला

Tourist Places in South India दक्षिण भारतातील ही ५ थंड हवेची ठिकाणे जी नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे

सकाळी रस्त्यावर जॉगिंग करत असताना घडलेला प्रकार अभिनेत्री नेहा पेंडसेने सांगितला

अक्षय कुमारच्या १३ वर्षांच्या मुलीला अश्लील संदेश पाठवून खाजगी फोटो मागितल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक

पुढील लेख
Show comments