Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Dadasaheb Phalke Award: रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, अभिनेत्याने हा पुरस्कार या लोकांना समर्पित केला

Webdunia
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (13:47 IST)
67 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा सोमवारी विज्ञान भवनात पार पडला. दरम्यान, सुपरस्टार रजनीकांत यांना 51 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विज्ञान भवनात उपस्थित असलेल्या प्रत्येकाने रजनीकांत यांच्या सन्मानार्थ उभे राहून टाळ्या वाजवल्या.
 
दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर रजनीकांत यांनी यासाठी भारत सरकारचे आभार मानले. ते आपल्या भाषणात म्हणाले- मला हा पुरस्कार प्रदान केल्याबद्दल मी भारत सरकारचे आभार मानतो. मी हा पुरस्कार माझ्या गुरु के. बालचंदर, माझा भाऊ सत्यनारायण राव आणि माझा ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर मित्र राज बहादूर यांना समर्पित करतो. 

<

#WATCH दिल्ली: भारत के उपराष्ट्रपति एम. वेंकैया नायडू और केंद्रीय सूचना एवं प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर ने अभिनेता रजनीकांत को दादासाहेब फाल्के पुरस्कार से सम्मानित किया। pic.twitter.com/8qMoMQAoBI

— ANI_HindiNews (@AHindinews) October 25, 2021 >रजनीकांत गेल्या पाच दशकांपासून सिनेमावर राज्य करत आहेत. तो अजूनही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड होते. रजनीकांत पाच वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. आईच्या मृत्यूनंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. रजनीकांतसाठीही घर चालवणे इतके सोपे नव्हते. घर चालवण्यासाठी त्यांनी हमालाचे  काम केले.
 
रजनीकांत चित्रपटात येण्यापूर्वी बस कंडक्टर(वाहक) म्हणून काम करायचे. रजनीकांत यांनी बालचंदर यांच्या अपूर्व रागंगल या चित्रपटाद्वारे तमिळ चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. सुपरस्टार रजनीकांत यांना दक्षिण भारतीय चित्रपटांचा नायक बनवण्याचे श्रेय बालचंदर यांना जाते. दादासाहेब पुरस्कार स्वीकारताना रजनीकांत म्हणाले की, बालचंदर या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी माझ्यासोबत नाही याचे मला दुःख आहे. रजनीकांत बालचंदर यांना आपले गुरू मानतात.
 
रजनीकांत यांनी कन्नड नाटकांद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. दुर्योधनाच्या भूमिकेतून रजनीकांत घरोघरी लोकप्रिय झाले.
 
त्यांनी 1983 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अंधा कानून हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. यानंतर रजनीकांत केवळ प्रगतीच्या शिडीवर चढले. आजतायगत त्यांना दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा स्टार म्हटले जाते. रजनीकांत यांचा जावई आणि अभिनेता धनुष यालाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

संबंधित माहिती

आयुष्मान खुरानाने त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय अरिजीत सिंगला दिले

भूल भुलैया 3 ने सिंघम अगेनला टाकले मागे, चार आठवड्यात 247 कोटींची कमाई

एआर रेहमानसोबतच्या नात्याच्या अफवांवर मोहिनी डे यांनी मौन सोडले

फोर्स ऑफ नेचर: द ड्राय 2 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला

अनुपमा'च्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू, निर्माता म्हणाले-

सन ऑफ सरदारच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन

ब्रम्हाजी मंदिर पुष्कर राजस्थान

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

बिग बॉस फेम हिमांशी खुरानाच्या वडिलांना पाच वर्षे जुन्या प्रकरणात अटक

वायलेंट हिरो' चा काळ: ताहिर राज भसीन

पुढील लेख
Show comments