Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डीडीएलजेच्या 'तुझे देखा तो' या गाण्याला बीबीसीने यूकेचे आवडते ९०च्या दशकातील बॉलीवूड गाणे म्हणून निवडले !

Webdunia
सोमवार, 3 जून 2024 (12:09 IST)
आदित्य चोपडाच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', ज्याला जगभरातील भारतीय आणि दक्षिण आशियाई लोक प्रेमाने 'डीडीएलजे' म्हणतात, या चित्रपटातील 'तुझे देखा तो' गाण्याला बीबीसीने यूकेचे ९०च्या दशकातील सर्वात आवडते बॉलीवूड गाणे म्हणून निवडले आहे!
 
डीडीएलजे हा हिंदी सिनेमाच्या इतिहासातील एक सर्वकालीन ब्लॉकबस्टर चित्रपट आहे, ज्याने शाहरुख खान आणि काजोलला अनेक पिढ्यांपर्यंत भारताचे सर्वात प्रिय फिल्मस्टार बनवले. डीडीएलजे आजही भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ चालणारा चित्रपट आहे आणि आजही मुंबईच्या प्रतिष्ठित मराठा मंदिर थिएटरमध्ये दररोज दाखवला जातो.
 
बीबीसीच्या एशियन नेटवर्कने श्रोत्यांना ५० उमेदवारांच्या यादीतून ९०च्या दशकातील सर्वोत्कृष्ट बॉलीवूड गाणे निवडण्यासाठी आमंत्रित केले होते. स्टेशनचे प्रस्तुतकर्ता हारून रशीद, निकिता कांडा, गगन ग्रेवाल आणि नादिया अली यांच्या सोबतच उद्योगतज्ञ असीम बर्नी, अमृता तन्ना आणि करण पंगाली यांच्या पॅनलने शॉर्टलिस्टची निवड केली होती.
 
या शॉर्टलिस्टमध्ये 'ये दिल्लगी' चित्रपटाचे 'ओले ओले' पासून ते 'खामोशी: द म्युझिकल' चित्रपटाचे 'बाहों के दरमियान' यांसारखी गाणी समाविष्ट होती. तथापि, सर्वसंमतीने विजेता ठरले ते १९९५च्या ब्लॉकबस्टर चित्रपटातील 'तुझे देखा तो' हे गाणे!
 
डीडीएलजेमध्ये राज (शाहरुख खान) आणि सिमरन (काजोल) यांची प्रेमकथा आहे. हे दोघे लंडनमध्ये राहणारे भारतीय आहेत, जे सिमरनच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध भेटतात आणि प्रेमात पडतात. 'तुझे देखा तो' गाण्यात एक दृश्य दाखवले आहे ज्यात युगल पिवळ्या सरसोंच्या फुलांनी भरलेल्या शेतात डांस करत आहेत - हे दृश्य ९०च्या दशकात भारताच्या पॉप संस्कृतीचे प्रतीक बनले . आजही हा दृश्य देशातील चित्रपटांमध्ये संदर्भित केला जातो, कारण याचा खूप मोठा नॉस्टॅल्जिक प्रभाव आहे! 'तुझे देखा तो' हे गाणे कुमार सानू आणि महान गायिका लता मंगेशकर यांनी गायले आहे आणि हे गाणे अनेक दशकांपासून संगीत स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक ऐकले जाणारे गाण्यांपैकी एक आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उर्मिला मातोंडकरच्या घटस्फोटाचे कारण काय? 8 वर्षांनंतर पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला

कमल हसनचा मणिरत्नम दिग्दर्शित 'ठग लाइफ' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण

ऑस्कर'मध्ये 'लापता लेडीज'च्या समावेशावर रवी किशनची प्रतिक्रिया

ज्येष्ठ तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार मिळाला

'द साबरमती रिपोर्ट' या दिवशी रिलीज होणार, नवीन पोस्टरसह तारीख जाहीर

सर्व पहा

नवीन

यश चोप्रा फाउंडेशन कडून आज यश चोप्रा यांच्या 92 व्या जयंतीनिमित्त YCF शिष्यवृत्ती कार्यक्रम जाहीर

World Tourism Day 2024: ही आहेत जगातील सात आश्चर्ये, पाहण्यासाठी या देशांना भेट द्या

पावसाळ्यात भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील 5 सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळे

पेरू खरेदी करताना लोक विचारतात

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

पुढील लेख
Show comments