rashifal-2026

कियाराचे जबरदस्त आउट फिट

Webdunia
बुधवार, 13 जानेवारी 2021 (11:33 IST)
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी चाहत्यांची आवडती अभिनेत्री बनली आहे. तिने हळूहळू आपल्या अभिनयाबरोबरच ड्रेसिंग सेन्सनेही प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. अक्षय कुमार ते शाहिद कपूरसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करणारी कियारा सध्या मालदीवच्या सुट्टीमुळे चर्चेत आहे. तिथे ती बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रासोबत गेली होती. मालदीवमधील फोटो शेअर केल्यानंतर ड्रेसिंग सेन्समुळे ती पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.
 
आउटिंगसाठी बाहेर पडलेली कियारा लव्हेंडर कलरच्या सुंदर आउटफिटमध्ये खूपच मोहक दिसत होती. कियाराने लव्हेंडर कलरमध्ये प्रीफाइड फ्लेयर्ड हाय वेस्ट पँट्‌ससह शिफॉन फॅब्रिकचा क्रॉप टॉप परिधान केला होता. ज्याचा अॅसबस्ट्रॅक्ट डिझाइन प्रिंट आणि स्क्वेअर  नेकलाइन खूपच सुंदर दिसत होता. त्याचवेळी, या क्रॉपटॉपमध्ये बनविलेले पफ स्लीव्ह आणि रफल डिझाइन खुलून दिसत होती. दरम्यान, कियाराने इंस्टाग्रामवरही एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या फोटोत ती जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले की, नव वर्षात फिट राहायचे आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास कियाराकडे सध्या शेरशाह, भूलभुलैया आणि जुग जुग जियो हे तीन चित्रपट आहेत. शेरशाहमध्ये तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा, तर भूलभुलैयामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिका साकारणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

2026 मध्ये ‘मर्दानी 3’पासून राणी मुखर्जी साजरे करणार आपल्या शानदार कारकिर्दीची 30 वर्षे

इंडियन आयडल सीझन 3 चा विजेता प्रशांत तमांग यांचे निधन

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या मुलाची पहिली झलक शेअर केली, त्याचे नाव सांगितले

ओ रोमियो' चा टीझर प्रदर्शित, शाहिद कपूर एका भयंकर अवतारात दिसला

धुरंधरच्या विक्रमी यशानंतर, रणवीर सिंग 'प्रलय' मध्ये झोम्बी अवतार साकारण्यास सज्ज

सर्व पहा

नवीन

अभिनेते जितेंद्र आणि तुषार कपूर यांनी मुंबईतील ११ मजली व्यावसायिक इमारत ५५९ कोटींना विकली

Election Joke निवडणुकीच्या काळात नेत्याला चावून घरी आलेला डास

मर्दानी 3 ची खलनायक अम्मा यांनी खळबळ उडवून दिली, प्रेक्षक थक्क झाले

बॉर्डर 2 : 23 जानेवारी 2026 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार

भारतातील रहस्यमय मंदिरे जी रात्री उघडतात, जिथे अंधारात दर्शन घेणे एक अद्भुत क्षण

पुढील लेख
Show comments