Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Pankhuri : अभिनेत्री पंखुरी ने जुळ्या मुलांना जन्म दिला

Webdunia
बुधवार, 26 जुलै 2023 (14:46 IST)
social media
सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री पंखुरी अवस्थी आणि गौतम रोडे यांना अखेर तो क्षण मिळाला आहे, ज्याची त्यांना प्रतीक्षा होती. होय, पंखुरीने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. सध्या या जोडप्याच्या घरात जल्लोषाचे वातावरण आहे. बुधवारी सकाळी कपलने सोशल मीडियावर ही गोड बातमी शेअर केली. तेव्हापासून सर्व सेलेब्स आणि चाहते पंखुरी आणि गौतमला दोन नवीन पाहुण्यांच्या आगमनाबद्दल शुभेच्छा देत आहेत.
 
अलीकडेच पंखुरी आणि गौतम यांनी चित्रासह एक नोट शेअर केली आहे की ती आणि तिचे पती गौतम रोडे यांनी 25 जुलै 2023 रोजी एक मुलगा आणि एका मुलीचे स्वागत केले आहे. पहिल्यांदा आई-वडील झाल्याचा आनंदही कपलने नोट  मध्ये लिहिला आहे,  आम्हाला एक मुलगा आणि मुलगी झाले आहे. 25 जुलै 2023 या, अंतःकरण आनंदाने आणि कृतज्ञतेने भरले. चार जणांचे कुटुंब म्हणून आमचा प्रवास सुरू झाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळण्यासाठी गौतम आणि पंखुरी यांच्याबद्दल आभारी आहे'.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pankhuri Awasthy Rode (@pankhuri313)

 
 
टीव्ही सीरियल स्टार्स गौतम रोडे आणि पंखुरी अवस्थी लग्नाच्या 5 वर्षानंतर आई-वडील झाले आहेत. दोघांनी 4 फेब्रुवारी 2018 मध्ये लग्न केले. आता लग्नाच्या 5 वर्षानंतर या स्टार जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले आहे. या आधी या स्टार जोडप्याने आपल्या गरोदरपणाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातूनच दिली होती.
 
गौतमने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सरस्वतीचंद्र, महाकुंभ एक रहस्य यासारख्या अनेक टीव्ही शोचा तो भाग आहे. याशिवाय त्याने चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही काम केले आहे. पंखुरीबद्दल बोलायचे तर ती ये है आशिकी, रझिया सुलतान, कौन है?, लाल इश्क, ये रिश्ता क्या कहलाता है, मॅडम सर, गुड से मीठी इश्क यांसारख्या शोमध्ये दिसली आहे.
 








Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

अलका याग्निक बनल्या वायरल अटॅकच्या श‍िकार

Pushpa 2 Release Date: पुष्पा 2: द रुल' ची रिलीज डेट जाहीर

भटकंती : एक निसर्गरम्य ठिकाण 'आंगुबे'

बकरीदच्या दिवशी स्वरा भास्करने शाकाहारी लोकांना टार्गेट केले

सोनाली बेंद्रेशी भेट झाली नाही म्हणून चाहत्याने केली आत्महत्या, अभिनेत्री म्हणाली-कोणी असे कसे....

पुढील लेख
Show comments