Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'साहो' चित्रपट प्रदर्शनाच्या काही वेळातच लीक

Saaho leaked
Webdunia
प्रभास आणि श्रद्धा कपूर स्टारर 'साहो' चित्रपटाला प्रदर्शनाच्या काही वेळातच पायरसीचा फटका बसला आहे. 'साहो' प्रदर्शित झाल्याच्या काही तासांतच ऑनलाइन लीक करण्यात आला आहे.
 
'साहो'साठी प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्सुकता होती. या चित्रपटासाठी प्रेक्षकांनी अॅडव्हान्स बुकिंगही केलं होतं. मात्र अशातच टोरंट साइट तमिल रॉकर्सकडून चित्रपट ऑनलाइन लीक करण्यात आला आहे. याआधीदेखील तमिल रॉकर्सकडून अनेक चित्रपट लीक करण्यात आले आहेत. तमिल रॉकर्स नावाची ही साइट जवळपास प्रत्येक आठवड्यात प्रदर्शित होणारे चित्रपट ऑनलाइन लीक करते. पहिल्याच प्रदर्शनानंतर तमिल रॉकर्सने 'जजमेंटल है क्‍या', 'पेटा', 'गली बॉय', 'ठग्‍स ऑफ हिंदोस्‍तान', 'विश्‍वासम' आणि '२.०' यांसारखे चित्रपट लीक केले आहेत.
 
पायरसी वाढवणाऱ्या आणि चित्रपट ऑनलाइन लीक करणाऱ्या या साइटवर सरकारने बंदी घातली आहे. पायरसीविरोधात 'फिल्‍म फेडरेशन ऑफ इंडिया'च्या सदस्यांकडून याबाबत आंदोलनही करण्यात आले. मद्रास उच्च न्यायालयाकडूनही याबाबत दखल घेण्यात आली. मात्र तरीही तमिल रॉकर्सकडून सतत चित्रपट लीक केले जात आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अजय देवगणच्या 'रेड 2' चा टीझर प्रदर्शित,आयकर अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत दिसणार

तारक मेहता मध्ये अखेर दयाबेन परत येतीये?

‘एप्रिल मे ९९’ मध्ये झळकणार ‘हे’ चेहरे

सनी देओलचा 'लाहोर 1947' या वर्षी प्रदर्शित होणार

अक्षय कुमारच्या केसरी 2 चा टीझर प्रदर्शित, जालियनवाला बाग हत्याकांडाची कहाणी दाखवली जाणार

सर्व पहा

नवीन

तारक मेहता मध्ये अखेर दयाबेन परत येतीये?

सैफअलीखान हल्ल्याच्या प्रकरणाला नवे वळण, आरोपीने मुंबई सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला

अजय देवगणच्या 'रेड 2' चा टीझर प्रदर्शित,आयकर अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत दिसणार

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

रेसिपी आणि मजेशीर कंमेंट्स

पुढील लेख
Show comments