Festival Posters

रजनीकांतच्या वाढदिवसासाठी 6700 कपकेक्सचे पोर्टेट

Webdunia
सुपरस्टार रजनीकांत यांनी अलीकडेच आपला 67 वा वाढदिवस साजरा केला. त्यांचा वाढदिवस हा त्यांच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. त्यानिमित्त अनेक चाहते अनेक उपक्रम करीत असतात.
 
चेन्नईतील सिटी ‍सेंटर मॉलमध्ये त्यांच्या अशाच चाहत्यांनी 6700 कपकेक्सचे एक मोझाईक पोर्टेट तयार केले. त्यांची किंमत दोन लाख रुपये होती. बटन्स कपकेक्सने यासाठी पुढाकरा घेतला होता. या बेकरीच्या सुचित्रा कार्तिक यांनी सांगितले की या उपक्रमासाठी एक महिन्यापासून नियोजन करण्यात आले होते.
 
हे केक बेक करण्याची प्रक्रिया 72 तास सुरु राहिली. आम्ही थलैवाचे मोठेच चाहते असून अतिशय उत्साहाने हा उपक्रम केला. अनेकांनी या कपकेक मोझाईकबरोबर सेल्फी टिपून घेतेले. थलैवाची गाणीही याठिकाणी वाजवण्यात येत होती. मूळचे महाराष्ट्रीयन असलेले शिवाजीराव गायकवाड ऊर्फ रजीनकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 मध्ये झाला. कर्नाटकात ते बस कंडक्टर होते व नंतर अभिनयाचे शिक्षण घेऊन त्यांनी तामिळनाडूमध्ये चित्रपटात काम करणे सुरु केले. एक मराठी माणसाचा हा प्रवास थक्क करणाराच आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

नीट वादावर बोलल्यामुळे विशाल दादलानीला 'इंडियन आयडॉल १६' मधून काढून टाकण्यात आले का? सत्य समोर आले

बॉबी देओलने यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला

मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'गव्हर्नर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरण ही थंड हवेची ठिकाणे कौटुंबिक सहलींसाठी उत्तम

आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे पुन्हा वधू-वर झाले; लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी पुन्हा लग्न केले, व्हिडिओ व्हायरल

पुढील लेख
Show comments