Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘न्यूटन’ ऑस्कर स्पर्धेतून बाहेर

Webdunia
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017 (15:35 IST)

राजकुमार यादवचा ‘न्यूटन’ हा चित्रपट ऑस्करच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. ‘ऑस्कर’च्या परदेशी भाषेतील चित्रपटांच्या विभागासाठी भारताकडून अधिकृतपणे ‘न्यूटन’ची प्रवेशिका पाठवण्यात आली होती. वेगवेगळ्या भारतीय भाषांमधील २६ चित्रपटांमधून ‘न्यूटन’ला ऑस्करच्या शर्यतीत पाठवण्याचा निर्णय १४ सदस्यीय निवड समितीने घेतला होता. ऑस्करने ट्विटरवरून अकॅडमी अवॉर्डच्या ‘फॉरेन लॅग्वेज फिल्म अवॉर्ड’ (परदेशी भाषा) विभागात जागा मिळवणा-या नऊ चित्रपटांची यादी जाहीर केली. या यादीत ‘अ फनटॅस्टिक वूमन’, ‘इन द फेड’, ‘ऑन बॉडी अ‍ॅण्ड सोल’, ‘फॉक्सट्राट’, ‘द इनसल्ट’, ‘लव्हलेस’, ‘फेलिसीट’, ‘द स्क्वायर’, ‘द वूंड’ चित्रपटांचा समावेश आहे.

अमित मसूरकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाने ‘न्यूटन’चे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटातून लोकशाही व्यवस्था आणि निवडणुका ही आपल्या समाजव्यवस्थेची दरवर्षी रंगणारी सर्कस दाखवताना दिग्दर्शक अमित मसूरकरने या व्यवस्थेतील मूळ विसंगतीवरच या चित्रपटातून अचूक बोट ठेवले होते.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला आग, मौल्यवान वस्तू जळून खाक

प्रसिद्ध संगीतकार अमित त्रिवेदी मतदान केंद्रावर जाऊनही मतदान करू शकले नाहीत, सोशल मीडिया वर सांगितले

यदाद्री लक्ष्मी नृसिंह मंदिर, सर्वात भव्य मंदिर

यामी गौतम आई बनली, एका सुंदर मुलाला जन्म दिला, संस्कृतमध्ये हे विशेष नाव दिले

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मतदान केलं

पुढील लेख
Show comments