Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘सेक्रेड गेम्स’चा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला हे आहेत त्यातील कलाकार

Webdunia
सोमवार, 6 मे 2019 (17:33 IST)
टीव्ही सोडून वेब विश्वातील देशातील हिंदी भाषेतील सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’चा सीक्वल अर्थात दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबद्दल दोन महिन्यापूर्वीच नेटफ्लिक्सच्या अधिकृत फेसबुक पेजवर केली होती. सीक्वलची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच आता नेटफ्लिक्सने वेब सीरिजमध्ये कोणकोणते कलाकार असणार आहेत याचा एक व्हिडिओ नेटफ्लिक्स इंडियाच्या युट्यूब अकाऊटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे या सिजनमध्ये कोणते कलाकार असतील हे समजले आहे. सेक्रेड गेम्सच्या पहिल्या भागांमध्ये असलेल्या कथानक, उत्तम कलाकार, त्यांचा अभिनय, संवाद आणि सिनेमॅटीक लिबर्टीच्या बळावर पहिल्या भागाने प्रेक्षकांना जिंकले होते. पहिल्या भागामधील सैफ अली खान (दिलबाग सिंग), नवाजुद्दीन सिद्दीकी (गणेश गायतोंडे), जतीन सारना (बंटी), पंकज त्रिपाठी (गणेश गायतोंडेचा तिसरा अध्यात्मिक गुरु) हे कलाकार पुढच्या भागातही दिसणार असून, यामध्ये नवीन कलाकारांचा समावेशही देखील झाला आहे. अभिनेत्री कल्की कोचलीन, अभिनेता रणवीर शौरी हे दोन नवीन कलाकार दिसणार आहेत. कल्की आणि रणवीर कोणते पात्र साकारणार आहेत हे अद्याप समोर आले नाही. पहिल्या भागातील जितेंद्र जोशी (काटेकर), राधिका आपटे (अंजली माथुर), कुब्रा सेट (कूकू) या मुख्य कलाकारांची एक्झीट झाल्याचे दाखवण्यात आले आहे.मात्र या नवीन भागात काय होते हे पाहणे उत्सुकता वाढवणारे ठरणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून खूप रडायचो ,शाहरुख खान अपयशावर बोलले

War 2 :हृतिक रोशनच्या 'वॉर 2 मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री!

Baaghi 4: बागी 4' चा फर्स्ट लूक आऊट, चित्रपट या दिवशी रिलीज होणार

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टची तिकिटे काही मिनिटांतच विकली,मुंबईत या तारखेला आहे कॉन्सर्ट

अनुपमा'च्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू, निर्माता म्हणाले-

प्राचीन भीष्मकनगर किल्ला अरुणाचल प्रदेश

धनुष-ऐश्वर्या रजनीकांत होणार वेगळे, घटस्फोटाचा निर्णय या दिवशी येणार

भारतात असलेले महाभारतातील खलनायकांचे मंदिर

पुढील लेख
Show comments