Marathi Biodata Maker

पुढील आठवड्यात ड्रग्स प्रकरणात सारा अली खान- श्रद्धा कपूरची चौकशी करू शकतेः NCB

Webdunia
सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (14:50 IST)
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अमली पदार्थांची चौकशी करणाऱ्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) चौकशीची आपली व्याप्ती वाढवली आहे. एनसीबी अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांची चौकशी करण्यासाठी समन्स पाठवू शकते.
 
सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिने एनसीबीच्या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रीत सिंग यांच्यासह बॉलिवूडमधील ए लिस्टमधील अजून अनेक सेलिब्रिटींची नावं दिली. यावर आता एनसीबी विचार करत असून येत्या काही दिवसांत तपास एजन्सी या कलाकारांना त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी बोलावणार आहे. सारा आणि श्रद्धा या दोघांनीही सुशांतसोबत सिनेमात काम केलं आहे.
 
एनसीबीने त्यांच्या तपासाचा वेग वाढवला
एनसीबी या प्रकरणात हळूहळू पुढे जात आहे आणि येत्या काही दिवसांत ते बॉलीवूड यासंबंधीचे प्रश्न विचारण्यासाठी बोलावू शकते. सूत्रांनी सांगितले की एनसीबी आगामी काळात सारा अली खान आणि श्रद्धा कपूरची चौकशी करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. सारा अली खान सुशांतबरोबर थायलंडच्या ट्रीपला गेली होती तर श्रद्धा कपूर सुशांतच्या फार्महाऊसवर दोनदा गेली होती. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती

सर्व पहा

नवीन

जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली

Shani Dev Jayanti महाराष्ट्रातील जागृत आणि प्रसिद्ध न्यायदेवता शनी मंदिरे

रजनीकांतच्या 'जेलर २' च्या सेटवर भीषण अपघात; विजेचा धक्का लागून क्रू मेंबरचा मृत्यू

कान्स चित्रपट महोत्सवात ट्रोल झाल्यानंतर सोनू सूद आलिया भट्टच्या समर्थनार्थ पुढे आले

मौनी रॉय आणि सूरज नंबियार यांनी एका संयुक्त निवेदनातून विभक्त होण्याची घोषणा करत, लग्नाच्या चार वर्षांनंतर आपला संसार संपवला

पुढील लेख
Show comments