Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केली, मात्र आत्महत्येमागील कारणे अद्याप समजू शकले नाही

Webdunia
रविवार, 14 जून 2020 (15:15 IST)
एमएस धोनी चित्रपटाचा अभिनेता सुशांतसिंग राजपूत (Sushant Singh Rajput)ने वांद्रेच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तपासासाठी मुंबई पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.  मागील काही दिवसांपासून सुशांत डिप्रेशनमध्ये होता. सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. सुशांतच्या नोकराने त्याच्या आत्महत्येविषयी पोलिसांना माहिती दिली.
 
सुशांतसिंग राजपूत याने आपल्या कारकीर्दीची सुरुवात टेलिव्हिजन जगात अभिनेता म्हणून केली होती. सुशांताने आपल्या करिअरची सुरुवात 2008 मध्ये टीव्ही सीरियल 'किस देश में है मेरा दिल' पासून केली होती. पण 'पवित्र रिश्ता' या मालिकांद्वारे त्याला खर्‍या अर्थाने ओळखले गेले. जीटीव्हीवर पवित्र रिश्ता सीरियलमध्ये सुशांत अंकिता लोखंडे यांच्यासमवेत दिसला. या दोघांचे बरेच दिवस प्रेमसंबंध होते.
 
टीव्हीवर पदार्पण करणार्‍या सुशांतसिंग राजपूतने आलिकडच्या वर्षांत मोठ्या पडद्यावर आपली उल्लेखनीय उपस्थिती दर्शविली होती. सुशांतने डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी, एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी, काय पो छे आणि छिछोरे अशा काही चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी फिल्म सुशांतसिंग राजपूतच्या कारकीर्दीचा सर्वात मोठा हिट चित्रपट आहे.

सुशांतने 2013 मध्ये 'काय पो छे !' हा चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात सुशांतच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. सुष्टच दुसरा चित्रपट 'शुद्ध देसी रोमांस' होता. या चित्रपटात त्याने एका रोमँटिक मुलाची भूमिका केली होती.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रश्मिका मंदानाने केले अटल सेतुचे कौतुक, PM मोदींनी दिल्या या प्रतिक्रिया

गरोदर दीपिका पदुकोणचा सोनोग्राफीचा फोटो व्हायरल

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण

पुढील लेख
Show comments