Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कवारंटाइनमध्ये रितेश जेनेलियाच्या प्रेमाला बहर (पाहा व्हिडिओ)

the love
बॉलिवूडमधील प्रेक्षकांचे लाडके कपल म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसुझा यांच्याकडे पाहिले जाते. या दोघांची लव्हस्टोरी आणि भन्नाट केमेस्ट्रिी तर सार्‍यांनाच माहीत आहे. बर्‍याच वेळा त्यांच्यातील हे प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना पाहायलाही मिळते. सध्या देशात लॉकडाउन असल्यामुळे सारेच जण घरात अडकले आहेत. त्यामुळे रितेश-जेनेलियादेखील घरीच असून सध्या ते त्यांच्या क्वालिटी टाइम व्यतीत करत आहेत. मात्र, या काळात ते सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्याही  संपर्कात आहेत.

विशेष म्हणजेहे दोघे टिकटॉकवर जास्त सक्रिय असून सध्या त्यांचा एक व्हिडिओ चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर क्वारंटाइनमध्ये त्यांच्या प्रेमाला बहर आल्याचे दिसून येत आहे.

सध्याच्या तरुणाईमध्ये टिकटॉकचे प्रचंड वेड असल्याचे पाहायला मिळते. विशेष म्हणजे अनेक कलाकारांनाही या टिकटॉकची भूरळ पडली आहे. मराठी कलाविश्वापासून ते बॉलिवूड कलाकारांर्पंत अनेक जण टिकटॉकवर सक्रिय आहेत. यामध्ये रितेश आणि जेनेलिया सर्वाधिक अ‍ॅक्टीव्ह असल्याचे पाहायला मिळते.  बर्‍याच वेळा ते वेगवेगळे व्हिडिओ यावर शेअर करत असतात. यात रितेशने एक व्हिडिओ शेअर करुन जेनेलियाप्रतीचे त्याचे प्रेम व्यक्त केले आहे.

रितेशने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत जेनेलिया दिसत असून ती पुस्तक वाचण्यात मग्न हे. तर रितेश ‘ मेरा दिल भी कितना पागल है' या गाण्यावर अभिनय करत आहे. हे गाणे ‘साजन' चित्रपटातील असून अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. 1919 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. त्यामुळे रितेशलादेखील या गाण्यातून त्याचे प्रेम व्यक्त करण्याचा मोह  आवरला नाही. मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर क्वारंटाइनमध्ये रितेश-जेनेलियाच्या प्रेमाला बहर आल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, रितेश आणि जेनेलिया टिकटॉकवर चांगलेच अ‍ॅक्टीव्ह असतात. त्यातच त्यांची लोकप्रियता अफाट असल्यामुळे येथे त्यांचे फॅन फॉलोव्हर्सदेखील प्रचंड आहेत. अलीकडेच रितेशने भांडी घासतानाचा एक भन्नाट व्हिडिओ शेअर केला होता. लॉकडाउनच्या काळात त्याला घरात राहून काम-काम काम करावी लागत आहे हे त्याने मजेशीर अंदाजात सांगितले होते. हा व्हिडिओ त्यावेळी चांगलाच व्हायरल झाला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शाहरुख खानने केली 25 हजार PPE किट्सची मदत, आरोग्य मंत्र्यांनी मानले आभार