Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयराम यांचा रास्ता अपघातात मृत्यू

Webdunia
रविवार, 12 मे 2024 (17:39 IST)
तेलुगू टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री पवित्रा जयराम यांचा भीषण रास्ता अपघातात दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्या आपल्या कार मधून कर्नाटकच्या दिशेने जात असताना कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यात हनकेरे जवळ त्यांची कार हैदराबादहून वनपर्थीकडे येणाऱ्या बसला धडकली आणि अपघात झाला. या अपघातात अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला. तर तिची चुलत बहीण अपेक्षा, अभिनेता चंद्रकांत आणि वाहन चालक श्रीकांत हे गंभीर जखमी झाले. ही बातमी कळताच टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे
 
अभिनेत्री पवित्रा जयराम ही मूळची कर्नाटकची असून रविवारी सकाळी महबूबनगर जिल्ह्यात भूतपूरनगरपालिकेच्या शेरीपल्ली बी गावाजवळ त्यांच्या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याची कार हैदराबादहून वानापर्थीच्या दिशेने जाणाऱ्या बसच्या उजव्या बाजूला धडकली आणि अपघात झाला.

हा अपघात एवढा भीषण होता की त्या जागीच ठार झाल्या. आणि कार मध्ये बसलेले अभिनेत्रीची बहीण,  अभिनेता चंद्रकांत आणि कार चालक श्रीकांत हे गंभीर जखमी झाले.पोलिसांना अपघाताची माहिती मिळतातच ते घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना स्थानिक रुग्णालयात नेले. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 

35 वर्षीय अभिनेत्री पवित्रा जयराम 'त्रिनयणी' या टीव्ही मालिकेने लोकप्रिय झाली. हा शो कन्नडमध्ये डब करण्यात आला आणि झी कन्नडवर प्रसारित झाला. यापूर्वी त्याने जोकली, रोबो फॅमिली, राधा रमन, नीली यांसारख्या शोमध्ये काम केले होते.अभिनेत्रींच्या निधनाची बातमी मिळतातच तिला सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहे. 
 
Edited by - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

पायरेट्स ऑफ द कॅरेबियन फेम अभिनेत्याचे निधन

अक्षय कुमारच्या सरफिरा चित्रपटातील मार उड़ी हे पहिले गाणे रिलीज झाले

टिटवाळा येथील महागणपती

मजेदार विनोद : प्लीज साखर टाकू नका

सानंदच्या रंगमंचावर 'बोक्या सातबंडे' हे बालनाट्य लहान मुलांसाठी खास ट्रीट

पुढील लेख
Show comments