suvichar

सेवाकर महागण्याची शक्यता

Webdunia
मंगळवारपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून दुसर्‍या दिवशी म्हणजे, बुधवारी 1 फेब्रुवारी रोजी अर्थ मंत्री अरुण जेटली हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी प्रथमच रेल्वे अर्थसंकल्प आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प एकत्र सादर केला जाणार आहे. 
 
नोटबंदीनंतर देशाला संबोधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजनांते सुतोवाच केले होते. त्यामुळे जेटली त्या व्यतिरिक्त काय जाहीर करतात, याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे. नोटबंदीमुळे त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून निश्चितच केला जाणार असला तरी पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे लागू झालेल्या आचारसंहितेचा भंग न करता, जेटली ही कसरत कशी करणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जेटली या अर्थसंकल्पात सेवा कर सध्याच्या पंधरा टक्क्यावरुन 16 ते 17 टक्क्यांपर्यंत वाढविण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसे झाल्यास हॉटेलिंग, दूरध्वनीचे देयक तसेच हवाई प्रवास महागणार आहे. येत्या एक जुलैपासून वस्तू व सेवा कर (जीएसटी)ची अंमलबजावणी करण्याचे सरकारने ठरविले आहे. जीएसटीमध्ये 5,12,18 व 28 टक्के असे करांचे स्लॅब निश्चित करण्यात आले आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

मुंबईत गोवंडीच्या शाळेत ६ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार, शालेय शिपायाला अटक

सलग तिसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात वाढ, आजचे दर जाणून घ्या

LIVE: मुंबईत गोवंडीच्या शाळेत ६ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार

मीरा-भयंदरमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण तापले, प्रताप सरनाईक यांचा प्रशासनाला इशारा

निदा खान प्रकरणात एआयएमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल सहआरोपी

पुढील लेख
Show comments