Festival Posters

7.5 श्रेयांक मिळविणारे विद्यार्थी PhD साठी पात्र

Webdunia
बुधवार, 15 जून 2022 (07:53 IST)
पदवी अभ्यासक्रमात 10 पैकी 7.5 श्रेयांक मिळवणारे विद्यार्थी कोणत्याही पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पूर्ततेविनाच पीएचडीसाठी पात्र ठरणार असल्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत. दर्जाहीन नियतकालिकांमध्ये आपले संशोधन प्रसिद्ध करण्याच्या पद्धतीला अटकाव करण्याच्या हेतूने यूजीसीने काही नवे नियम घालून दिले आहेत. आपल्या संशोधनाचे पेटंट करून घ्यावे किंवा विद्वत प्रमाणित नियतकालिकांमध्ये (पीअर रिव्हय़ूड जर्नल्स) संशोधन प्रसिद्ध करावे, असे म्हटले आहे.
 
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत विकसित करण्यात आलेल्या प्रथम वर्ष पदवी कार्यक्रमानुसार 8 सत्रांच्या 4 वर्षीय अभ्यासक्रमानंतर पीएचडीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी 10 पैकी 7.5 श्रेयांक मिळवणे आवश्यक आहे. यात अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष विद्यार्थी आणि आर्थिकदृष्टय़ा मागास वर्गाला 0.5 श्रेयांकाची सूट देण्यात आली आहे.
 
4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या संशोधक वृत्तीच्या विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी प्रोत्साहन देणे हे उच्च शिक्षण संस्थांमधील संशोधन वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे यूजीसीने म्हटले आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांना 7.5 पेक्षा कमी श्रेयांक आहेत. त्यांना पीएचडीला प्रवेश घेण्यासाठी एक वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

World Consumer Day 2026 जागतिक ग्राहक दिन माहिती

घर नेहमी सुगंधी ठेवण्यासाठी वापरा हे 5 सोपे उपाय

Gudi Padwa 2026 गुढीपाडव्यासाठी खास अशा काही पारंपरिक पाककृती

उन्हाळा सुरू झाला! उष्माघातापासून वाचण्यासाठी आजपासून या 7 सवयी लावा

Career in Bachelor of Science in Physician Assistant :बॅचलर ऑफ सायन्स इन फिजिशियन असिस्टेंट कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments