Marathi Biodata Maker

Mango Pickle : या सोप्या पद्धतीने बनवा कैरीचे लोणचे

Webdunia
बुधवार, 16 एप्रिल 2025 (13:19 IST)
Mango Pickle : लोक वर्षभर उन्हाळ्याची वाट पाहत असतात. याचे एक कारण म्हणजे या ऋतूत आंबे येतात. आंब्याचे शौकीन लोक अनेक प्रकारे त्याचे सेवन करतात. कैरीचे लोणचे अनेकांना आवडते. या हंगामात भारतीय घरांमध्ये अनेक प्रकारचे आंब्याचे लोणचे बनवले जातात.
 
उन्हाळ्यात आंब्याचे लोणचे नीट साठवले तर वर्षानुवर्षे वापरता येते, असे म्हणतात. आंब्याचे लोणचे बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवा. आंब्याचे लोणचे बाजारात उपलब्ध असले तरी घरी बनवलेल्या लोणच्याची चव वेगळी असते. सोप्या पद्धतीने घरी कैरीचे लोणचे कसे बनवायचे ते शिकवणार आहोत. हे बनवून तुम्ही दीर्घकाळ साठवू शकता.चला तर मग रेसिपी जाणून घेऊ या.
 
साहित्य -
कैरी: 1 किलो
मीठ: 100 ग्रॅम
हळद पावडर: 2 चमचे
लाल मिरची पावडर: 2 चमचे
मोहरीचे तेल: 250 मि.ली
मेथी दाणे: 2 चमचे
बडीशेप: 2 टेस्पून
हिंग: 1/2 टीस्पून
मोहरी: 2 टेस्पून
 
कृती
कैैैैरीचे लोणचे बनवण्यासाठी प्रथम कैैैरी नीट धुवून वाळवून घ्या. सूर्यप्रकाशात वाळवून त्याचे  लहान तुकडे करा. कोय कडून टाका. 
यानंतर कैरीचे तुकडे एका मोठ्या भांड्यात मध्ये ठेवा आणि त्यात मीठ आणि हळद घाला. आता ते चांगले मिसळा आणि 1-2 तास झाकून ठेवा जेणेकरून आंब्याचे पाणी निघून जाईल.
आता कढईत मोहरीचे तेल गरम करा. त्यातून धूर येईपर्यंत गरम करा. नंतर तेल थंड होऊ द्या. तेल थंड होत असताना मेथीदाणे आणि बडीशेप हलके परतून घ्या आणि थंड झाल्यावर बारीक वाटून घ्या. यानंतर एका मोठ्या भांड्यात मोहरी, मसाल्याचे मिश्रण, लाल तिखट आणि हिंग एकत्र करा.
 
मसाल्याच्या मिश्रणात मीठ आणि हळद मिसळलेले आंब्याचे तुकडे घाला. यानंतर, आंब्यामध्ये मोहरीचे तेल घाला आणि सर्वकाही चांगले मिसळा. आंब्याचे लोणचे तयार.आता हे लोणचे तुम्ही साठवून ठेवू शकता. 
ALSO READ: लिंबू-आल्याचे लोणचे रेसिपी
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

साप्ताहिक राशिफल 09 नोव्हेंबर 2025 ते 15 नोव्हेंबर 2025

बिहारचे प्राचीन नाव काय होते? महाभारत काळात त्याचा राजा कोण होता?

10 special gift ideas for birthdays वाढदिवसासाठी १० खास भेटवस्तू कल्पना

साठीतही चेहऱ्यावर पंचविशीतली लकाकी कशी टिकवाल? या चीनी पद्धतीचे रहस्य

सर्व पहा

नवीन

शरीराला दररोज किती कॅल्शियमची आवश्यकता असते , योग्य वेळ जाणून घ्या

सलंबा भुजंगासन कसे करायचे त्याचे फायदे जाणून घ्या

पंचतंत्र : माकड जंगलाचा राजा बनला

Litti Chokha बिहारचा 'लिट्टी-चोखा' घरी बनवण्याची सोपी आणि पारंपरिक रेसिपी

Foods to avoid with Milk दुधासोबत काय खाऊ नये?

पुढील लेख
Show comments