Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Shiv Jayanti Tithi Date 2023: तिथीनुसार शिवाजी महाराज यांची जयंती 10 मार्च

Webdunia
गुरूवार, 9 मार्च 2023 (22:30 IST)
जन्म दिनांक -19 फेब्रुवारी 1630
मृत्यू  दिनांक - 3 एप्रिल 1680
 
भारतातील वीरपुत्रांपैकी एक असे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तर सर्वांना माहितीच आहे. आज देखील ह्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणून म्हणतात. तर काही लोक ह्यांना मराठांचा अभिमान किंवा मराठांचा गौरव असे ही म्हणतात. ते भारतीय प्रजासत्ताकचे महान सेनानायक होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये एका मराठा कुटुंबात झाला काहींच्या मते,त्यांच्या जन्माचे वर्ष 1627 सांगतात. त्यांचे पूर्ण नांव शिवाजी राजे भोसले असे होते. फाल्गुन वद्य तृतीयेला देखील तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाईल असे जाहीर केले. यंदा शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती 10 मार्च रोजी आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाबाई ह्याचे पुत्र होते. त्यांची जन्मस्थळी पुण्याच्या नजीक शिवनेरी गड आहे.
राष्ट्राला परकीय आणि आक्रमक सत्तेपासून मुक्त करून संपूर्ण भारतात सार्वभौमिक स्वतंत्र राज्य बनविण्याचा प्रयत्न स्वतंत्रतेचे एकमेव पुजारी वीर प्रवर छत्रपती शिवाजी महाराजांनी केले होते. अशा प्रकारे त्यांना एक अग्रगण्य,वीर आणि अमर स्वातंत्र्य सैनिक म्हणून स्वीकारले जाते. महाराणाप्रतापाच्या प्रमाणे वीर छत्रपती शिवाजी राष्ट्रीयताचे जिवंत प्रतीक होते. चला तर मग श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जाणून घेऊ या.       
 
* मुस्लिम विरोधी नव्हते छत्रपती शिवाजी महाराज - 
छत्रपती शिवाजी महाराजांवर मुस्लिम विरोधी असल्याचा आरोप करण्यात आला होता. परंतु हे खरे नाही कारण त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सैनिक म्हणून तर होतेच, परंतु अनेक मुस्लिम सरदार आणि सुबेदार देखील होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व संघर्ष त्या कट्टरपणा आणि अभिमानाच्या विरोधात होता, ज्याला औरंगज़ेब सारखे शासक आणि त्याच्या सावलीत वाढणाऱ्या लोकांशी होते. 
1674 मध्ये उन्हाळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी दणक्यात सिंहासनावर बसून स्वतंत्र सार्वभौमत्वाचा पाया घातला. दबलेली घाबरलेली हिंदू जनतेला त्यांनी भीतिमुक्त केले.तसे बरेच ख्रिस्ती आणि मुस्लिम राजे बळजबरीने बहुतेक लोकांवर आपली मते थोपावीत होते. बळजबरी कर घ्यायचे.परंतु छत्रपती शिवाजीराजे ह्यांचा राजवटीत या दोन्ही पंथेच्या उपसनास्थळांचे नव्हे तर धर्मांतरित झालेल्या मुसलमान आणि ख्रिस्तीं लोकांसाठी भीतिमुक्त वातावरण देखील तयार केले. 
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आठ मंत्र्यांच्या परिषदेद्वारे तब्बल सहा वर्ष राज्य केले. त्यांच्या प्रशासकीय सेवेत अनेक मुसलमान देखील होते. 
 
* धार्मिक संस्काराची शिदोरी -
त्यांनी त्यांचे बालपण त्यांची आई राजमाता जिजाऊ ह्यांच्या मार्गदर्शनाखाली घालवले. राजमाता जिजाऊ या धार्मिक स्वभावाच्या असून गुणी स्वभावाच्या आणि व्यव्हाराने वीर माता होत्या.म्हणूनच त्याने बाळ शिवबांना चांगले वाढविले. ते लहानग्या शिवबांना रामायण, महाभारतातील तसेच इतर भारतीय वीरांच्या तेजस्वी कथा ऐकवत होत्या आणि तशी शिकवणी दिली. दादा कोंडवदेवांच्या संरक्षणाखाली छत्रपती शिवाजी राजे ह्यांना सर्वप्रकाराच्या सांस्कृतिक आणि राजकारणाच्या  शिक्षणाचे धडे देखील दिले आणि त्यामध्ये पारंगत देखील केले. त्या काळात छत्रपती शिवाजी महाराज संत रामदास स्वामींच्या सानिध्यात राहून पूर्णपणे राष्ट्रवादी, कर्तव्यपरायण आणि कष्टकरी योद्धा बनले.

* बालपणातच गड जिंकणे शिकले- 
बालपणातच छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सवंगडीना घेऊन त्यांचे नेतृत्व करून युद्धाचे खेळ आणि गड जिंकण्याचे खेळ खेळायचे. तारुण्यावस्थेत येतातच त्यांचे बालपणीचे खेळ खरोखरच शत्रूंवर हल्ला करून त्यांचे गड जिंकणारे होऊ लागले. पुरंदर आणि तोरणागड जिंकल्यावर तर जणू सर्वीकडे त्यांच्या नावाची आणि त्यांनी केलेल्या कार्याची प्रसिद्धी साऱ्या दक्षिणे कडे पसरत गेली. ही बातमी एखाद्या आगेप्रमाणे  दिल्ली आणि आग्रा पर्यंत पोहोचली आततायी तुर्की, यवन आणि त्यांचे सर्व शासक आणि सहकारी देखील छत्रपतींचे नांव ऐकून घाबरायचे आणि काळजीत होते.     
 
* पत्नी आणि अपत्ये -
छत्रपती शिवाजी महाराजांचे लग्न 14 मे, 1640 मध्ये सईबाई निंबाळकर ह्यांच्या सह पुण्याच्या लालमहालात झाले. त्यांच्या मुलाचे नांव छत्रपती संभाजी राजे होते. छत्रपती संभाजी राजे( जन्म -14 मे,1657- मृत्यू 11 मार्च 1689) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात थोरले पुत्र आणि उत्तराधिकारी होते, ह्यांनी 1680 ते 1689 पर्यंत राज्य केले. छत्रपती संभाजी आपल्या वडिलांच्या प्रमाणे परिश्रमी आणि दृढ निश्चयी नव्हते. त्यांच्या मध्ये ह्या दोन्ही गोष्टींचा अभाव होता. छत्रपती संभाजींच्या पत्नीचे नांव येसूबाई होते. त्यांना राजाराम नावाचे पुत्ररत्न झाले जे त्यांचे उत्तराधिकारी होते. 
 
* बालसाहित्यकार  -
छत्रपती संभाजी ह्यांना जगातील प्रथम बालसाहित्यकार मानले जाते. वयाच्या 14 व्यावर्षी बुद्धभूषणम(संस्कृत) नायिकाभेद,सातसतक, नखशिख( हिंदी) इत्यादी ग्रंथ लिहिणारे छत्रपती संभाजी राजे हे जगातील पहिले बालसाहित्यकार होते. मराठी, हिंदी,पर्शियन भाषा,संस्कृत, इंग्रजी, कन्नड इत्यादी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. ज्या प्रमाणे ते वेगाने लेखणी चालवायचे त्याच प्रमाणे ते तलवार देखील चालवायचे. छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण 8 पत्नी होत्या आणि दोन मुले आणि 6 मुली होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोरल्या मुलाच्या धार्मिकतेमुळे त्यांची शेवटची काही वर्षे संकटात गेली. 
त्यांचे हे थोरले पुत्र एकदा मुघलांना जाऊन सामील झाले. तेव्हा त्यांना बऱ्याच अडचणींनी त्या मुघलांच्या ताब्यातून सोडवून आणले. घरातील मतभेद आणि मंत्र्यांच्या परस्पर विरोधामुळे संघर्ष करीत आणि शत्रूंपासून आपल्या साम्राज्याचे रक्षण करण्याच्या काळजी ने लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांना मृत्यूच्या सापळ्यात अडकविले. छत्रपती शिवाजी महाराजांची मृत्यू  काही काळ आजारी असल्यामुळे आपल्या राजधानीत डोंगरगडी राजगडावर 3 एप्रिल 1680 मध्ये झाली.    
 
* फसवून छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा कट रचला-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाढत्या वैभवाने घाबरलेला बिजापूरचा राजा अदिलशहा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना अटक करू शकला नाही, तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांना म्हणजे छत्रपती शहाजी महाराजांना अटक करून तुरंगात टाकले. छत्रपती शिवाजी महाराजांना हे कळल्यावर ते फार संतापले आणि त्यांनी नीतीने आणि सामर्थ्याने छापामारून लवकरच आपल्या वडिलांना त्याचा ताब्यातून सोडविले. तेव्हा चिडून बिजापुराचा या राजाने छत्रपती शिवाजी महाराजांना जिवंत किंवा मृत पकडून आणण्याचा आदेश दिला. आपल्या धूर्त सेनापती अफजल खान ह्याला बंधुत्वाचे खोटे नाटक आणि कट कारस्थान रचून  छत्रपती शिवाजी महाराजांना गळेभेट करून मारण्याचा डाव रचला. परंतु तो स्वतः महाराजांच्या हातून त्यांनी लावलेल्या वाघनखांमुळे ठार मारला गेला. आपल्या सेनापतीला मारलेले बघून अफजल खानच्या सैन्या ने पळ काढला.  
 
* मुघलांशी लढत -
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाढत्या सामर्थ्याला बघून मुघल बादशहा औरंगजेब घाबरला आणि त्याला काळजी वाटू लागली त्याने दक्षिणेस नेमलेल्या सुभेदारांना त्यांच्या वर हल्ला करण्याचा सल्ला दिला.परंतु सुभेदाराला तोंडघाशी पडावे लागले. छत्रपती शिवाजी राजे ह्यांच्याशी लढताना त्याला त्याचा पुत्र गमवावा लागला. त्याचे स्वतःचे बोट कापले गेले. त्याला रणांगणातून पळ काढावा लागला. या घटने नंतर औरंगजेबाने आपल्या सर्वात प्रभावशाली सेनापती मिर्जा राजा जयसिंह च्या नेतृत्वात सुमारे1,00,000 सैनिकांची फौज पाठविली.
छत्रपती शिवाजी महाराजांना चिरडून टाकण्यासाठी राजा जयसिंगाने बिजापूरच्या सुलतानाशी संधी करून  पुरंदरच्या किल्ल्याला काबीज करण्याच्या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 24 एप्रिल,1665 रोजी 'वज्रगडचा ' किल्ला ताब्यात घेतला. पुरंदराच्या किल्ल्याचे रक्षण करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत शूर सेनापती मुरारजी बाजी हे हुतात्मा झाले. पुरंदर किल्ला वाचविण्यात स्वतःला असक्षम समजून छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंग ह्याच्या सह संधी करण्याची तयारी दर्शविली.दोन्ही पक्ष संधी करण्यास तयार झाले आणि 22 जून, 1665 ला 'पुरंदर संधी' झाली.    
 
* छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची सीमा- 
पूर्वेकडील सीमा उत्तरेकडील बागलना ह्याला स्पर्श करत जायची  आणि दक्षिणेकडे नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या मधून होऊन एक अनिश्चित सीमा रेषा सह सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या जास्ती जास्त भाग आपल्या मध्ये समाविष्ट करून घेतले असे. पश्चिमी कर्नाटकाचे काही क्षेत्र नंतर समाविष्ट झाले. स्वराज्याच्या हा भाग तीन मुख्य भागात विभागलेला होता.   
 
1 पुण्या पासून सल्हर पर्यंतचा भाग कोंकणच भाग, या मध्ये उत्तरी कोंकणांचा भाग देखील समाविष्ट आहे. हा भाग पेशवा मोरोपंत पिंगळे ह्याच्या ताब्यात होता. 
2 उत्तरी कनारा पर्यंत दक्षिणी कोंकणच भाग अण्णाजी दत्तो च्या आधिपत्यात होता.  
3 दक्षिणी देशाच्या जिल्ह्यात, या मध्ये सातारापासून घेऊन धारवाड आणि कोफालचा भाग आहे. हा भाग दक्षिण पूर्वी भागात येत असायचे आणि हे दत्ताजी पंत ह्यांच्या ताब्यात होते. हे तीन सुबे पुन्हा तीन परगणा आणि तालुक्यात विभागले होते. परगणा मध्ये तरफ आणि मौजे यायचे.  
 
* छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य- 
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले स्वतःचे एक सैन्य तयार केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्या सैन्यात 30 -40 हजार नियमित आणि कायमस्वरूपी नेमणूक केलेले घोडेस्वार, एक लाख पादचारी आणि 1260 हत्तींचा समावेश होता.तोफखाने किती होते त्या बाबतीत ठळक माहिती नाही.
घोडदळ किंवा घुडस्वार सैन्य हे 2 भागात विभागले होते. बारगीर आणि घुडस्वार सैनिक होते. ह्यांना राज्याकडून घोडे आणि शस्त्रे देण्यात येत होती. सिल्हदार ज्यांना स्वतःच व्यवस्था करावी लागत होती.या घोडदळाच्या सर्वात लहान तुकडीत 25  शिपाई असायचे.ज्यांच्या वर एक हवालदार असायचा पाच हवालदारांचा मिळून एक जुमला असायचा ज्यांच्या वर एक जुमलेदार असायचा दहा जुमलेदार मिळून एक हजारी असायचा आणि पाच हजारीच्या वर एक पंच हजारी असायचा. तो सरनौबताच्या खाली असायचा. प्रत्येक 25 तुकड्यांसाठी राज्याकडून एक नाविक आणि भिश्ती दिले जात होते.
 
* छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले -
मराठा सैन्य यंत्रणेची वैशिष्ट्ये होते किल्ले. कथावाचकांच्या मते, छत्रपती शिवाजी महाराजांकडे एकूण 250 किल्ले होते. या किल्ल्यांच्या दुरुस्तीवर ते खूप खर्च करायचे.छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड जिंकले होते ज्यामध्ये एक असे सिंहगड किल्ला. हा गड जिंकण्यासाठी महाराजांनी तानाजी ह्यांना पाठविले होते. या मध्ये विजय मिळविण्यासाठी तानाजींना स्वतःचे प्राण गमवावे लागले. गड आला पण सिंह गेला(गड तर आपण जिंकलो पण सिंह आपल्याला सोडून गेला).अशे उद्गार छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजींसाठी काढले होते. 
बिजापूरच्या सुलतानच्या राज्याच्या हद्दीत रायगड(1646) मध्ये चाकण, सिंहगड आणि पुरंदर सारखे किल्ले देखील त्यांच्या आधिपत्याखाली आले.
 
* छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्रा प्रवास-
आपल्या सुरक्षेचे पूर्णपणे आश्वासन मिळाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आग्राच्या दरबारात औरंगजेबाला भेटण्यास तयार झाले.ते दरबारात 9 मे,1666 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मुलासह म्हणजे छत्रपती संभाजीराजे आणि सुमारे 4000 सैन्यासह मुघल दरबारात हजर झाले,परंतु तिथे त्यांचे आदरातिथ्य औरंगजेबाने न केल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांनी भरलेल्या दरबारात औरंगजेबाला विश्वासघातकी म्हटले होते. औरंगजेबाने चिडून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मुलाला 'जयपूर भवन ' मध्ये कैद केले. इथून छत्रपती शिवाजी महाराज 13 ऑगस्ट,1666 रोजी फळांच्या पेटीत बसून लपून निघाले होते आणि 22 सप्टेंबर रोजी रायगड पोहोचले.
 
* गनिमी युद्धाचे अविष्कारक -
असं म्हणतात की भारतात प्रथमच गनिमीयुद्धा ची सुरुवात  छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. त्यांच्या या युद्ध नीती पासून प्रेरणा घेऊन व्हिएतनामींनी अमेरिकेशी लढाई जिंकली. या युद्धाच्या वर्णन त्याकाळातील रचलेल्या 'शिव सूत्र' मध्ये सापडते. गोरिल्ला किंवा गनिमी युध्द म्हणजे हा एक प्रकारचा छापामार युध्द आहे जे अर्धसैनिकांच्या तुकडी किंवा अनियमित सैनिकाने शत्रुसैन्याच्या मागे किंवा मागील बाजू ने हल्ला करतात. 
 
* समर्थ रामदास-          
हिंदू पद पादशाही चे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी ह्यांचे नांव भारतातील साधू संतांमध्ये तसेच विद्वत समाजात प्रसिद्ध आहे. त्यांनी 'दासबोध' नावाच्या एक ग्रंथाची रचना केली जे मराठी भाषेत लिहिले आहे.
संपूर्ण भारतात म्हणजे काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत त्यांनी 1100 मठ आणि आखाड्यांची स्थापना केली आणि स्वराज्याच्या  स्थापनेसाठी जनतेला तयार करण्याच्या प्रयत्न केला. त्यांना आखाड्यांची स्थापना करण्याचा सर्व श्रेय दिला जातो म्हणून त्यांना भगवान हनुमानाचे अवतार म्हटले आहे ते भगवान हनुमानाचे भक्त होते.   
छत्रपती शिवाजी महाराज आपल्या गुरुकडून प्रेरणा घेऊनच कोणतेही काम करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांना 'महान शिवाजी बनविण्या मध्ये सर्वात मोठे योगदान समर्थ रामदासांचे आहे.
 
* आई तुळजा भवानीचे उपासक- 
महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे तुळजापूर. या स्थळी छत्रपती शिवाजी महाराजांची कुळदेवी आई तुळजा भवानी स्थापित आहे. जे आजतायगत महाराष्ट्राच्या आणि इतर राज्याच्या अनेक रहिवाशींची कुळदेवी म्हणून प्रख्यात आहे किंवा प्रचलित आहे.वीर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची  कुळदेवी आई तुळजा भवानी आहे. महाराज नेहमी त्यांचीच उपासना करायचे. अशी आख्यायिका आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना खुद्द देवी आईने प्रगट होऊन तलवार दिली होती. सध्या ही तलवार लंडन च्या संग्रहालयात ठेवलेली आहे.
 
* दीर्घ आजारामुळे 1680 मध्ये वीर छत्रपती शिवाजी महाराजांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या संपूर्ण साम्राज्याला त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलाने छत्रपती संभाजी राजे ह्यांनी सांभाळले.  
 
महाराsssssज गडपती,गजअश्वपती,भूपती,प्रजापती,सुवर्णरत्न श्रीपती,अष्टवधानजागृत अष्टप्रधानवेष्टित,न्यायालंकारमंडित,शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत,राजनितिधुरंधर प्रौढप्रतापपुरंदर,क्षत्रियकुलावतंस,
सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अनेक महिने खराब होणार नाही मिठाई, या सोप्या टिप्स अवलंबवा

Healthcare Tips : दिवाळीच्या काळात दमा रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स

आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर दिवाळीत हे नक्की खरेदी करा

दिवाळीचे साप्ताहिक राशिभविष्य, जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

सर्व पहा

नवीन

Firecrackers Burning Remedies : फटाक्याने हात भाजल्यास हे उपाय करा

बदाम शिरा रेसिपी Badam Halwa

लक्ष्मीपूजन विशेष नैवेद्य : सोप्पी रेसिपी पेढा

दिवाळीत अशा प्रकारे चेहऱ्याची चमक वाढवा,या कॉन्टूरिंग मेकअप टिप्स अवलंबवा

Career in MBA Family Business Management : एमबीए फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट मध्ये करिअर

पुढील लेख
Show comments