Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जपानमधून ११९ भारतीयांना सुखरूप मायदेशी आणलं

Webdunia
गुरूवार, 27 फेब्रुवारी 2020 (10:38 IST)
कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडलेल्या जपानमधूनही ११९ भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यात आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जपानमधील एका क्रुझवर अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या एका विशेष विमानानं त्यांना भारतात आणण्यात आलं आहे. यामध्ये भारतीयांसोबतच श्रीलंका, नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि पेरूच्या नागरिकांचीही सुटका करण्यात आली आहे. या नागरिकांच्या मदतीनंतर जपाननंही भारताचे आभार मानले आहेत. तर दुसरीकडे भारतीय हवाई दलाच्या एक विमानातून चीनमधील वुहान शहरात अडकलेल्या ११२ भारतीय आणि परदेशी नागरिकांनादेखील भारतात आणण्यात आलं आहे.
 
परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली. टोक्योतून एअर इंडियाच्या विशेष विमानानं ११९ भारतीय आणि श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि पेरूच्या पाच नागरिकांना सुखरूप दिल्लीत आणलं आहे. या सर्वांना कोरोना व्हायरसमुळे डायमंड प्रिंसेस या जहाजावर वेगळं ठेवण्यात आलं होतं. जपानच्या अधिकाऱ्यांची मदत महत्त्वपूर्ण आहे. एअर इंडियाचे पुन्हा एकदा धन्यवाद. अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अनेक महिने खराब होणार नाही मिठाई, या सोप्या टिप्स अवलंबवा

Healthcare Tips : दिवाळीच्या काळात दमा रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स

आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर दिवाळीत हे नक्की खरेदी करा

दिवाळीचे साप्ताहिक राशिभविष्य, जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

सर्व पहा

नवीन

बोपण्णा-एबडेन यांनी एटीपी फायनल्स स्पर्धेत स्थान मिळवले

राष्ट्रवादीचे उमेदवार नवाब मलिक यांचा प्रचार करण्यास भाजपचा नकार

मुंबईत जेवण्यापूर्वी बळजबरी जय श्रीराम घोषणा लावण्याचा आरोप

धक्कादायक : विद्यार्थ्याने स्वतःला सुपरमॅन समजत चौथ्या मजल्यावरून मारली उडी

रेल्वे स्थानकांवरील गर्दीवर अखिलेश यादवांनी भाजपला लगावला टोला

पुढील लेख
Show comments