देशभरात करोनाग्रस्तांची संख्या 6 हजार 671 वर पोहचली आहे. मागील 24 तासात 896 करोना पॉझिटिव्ह आढळल्याने ही संख्या वाढली आहे.
देशात आत्तापर्यंत करोनाची लागण झाल्यामुळे 206 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 516 जणांना विविध रुग्णालयांमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन टॅबेलटची भारताची सध्याची गरज 1 कोटी गोळ्या असल्याची माहिती देण्यात आली.